KSBKBT 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

"जय श्री कृष्णा"; स्मृती इराणींच्या KSBKBT 2मध्ये बिल गेट्स यांची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Bill Gates Entry In KSBKBT : स्मृती इराणी यांच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' मालिकेत बिल गेट्स यांची एन्ट्री होणार आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

स्मृती इराणी यांची 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.

'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'मध्ये स्मृती इराणी या तुलसीच्या भूमिकत दिसत आहेत.

'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' मालिकेत बिल गेट्स यांची एन्ट्री होणार आहे.

सध्या लोकप्रिय मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2) प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत स्मृती इराणी (Smriti Irani) या झळकल्या आहेत. या मालिकेत आजपर्यंत टिव्ही शोमध्ये कधीही न घडलेली घटना घडणार आहे. नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' मध्ये एका खास पाहुण्याचे आगमन होताना दिसत आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेत स्मृती इराणी यांनी तुलसी विरानीची भूमिका साकारली आहे.

'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'मध्ये चक्क अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स (Bill Gates) येणार आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तुलसी विरानी आणि बिल गेट्स हे व्हिडीओ कॉलवर बोलत असतात. तेव्हा तुलसी म्हणते की, "जय श्री कृष्णा" त्यावर बिल गेट्स म्हणतात की, "नमस्ते तुलसी जी, जय श्री कृष्णा" पुन्हा तुलसी म्हणते की, "खूप चांगले वाटले की तुम्ही थेट अमेरिकेतून माझ्या कुटुंबाशी संपर्क साधला. तुमची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. " यावर बिल गेट्स म्हणतात की, "थँक्यू तुलसी जी"

बिल गेट्स 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' पाहुणे कलाकार म्हणून येणार आहेत.महिला आणि मुलांचे आरोग्य यावर चर्चा करताना बिल गेट्स दिसणार आहेत. बिल गेट्स आल्यावर मालिकेत काय काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार नाही. चाहते येणाऱ्या एपिसोडसाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' मालिका 29 जुलै पासून सुरू झाली आहे. मालिका रात्री 10:30 वाजता 'स्टार प्लस' वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. तर जिओ हॉटस्टारवर देखील तुम्ही मालिका पाहू शकता.

'क्योंकि सास भी कभी बहू थी' 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने 2008ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता 25 वर्षानंतर तुलसी प्रेक्षकांना भेटायला आली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT