Thamma Collection : 'थामा'ची बंपर ओपनिंग; पहिल्याच दिवशी 'सैयारा'ला पछाडलं, रश्मिका-आयुष्मानची जोडी सुपरहिट

Thamma box office collection day 1 : साउथ सुपरस्टार रश्मिका मंदानाचा 'थामा' चित्रपट रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी 'थामा'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Thamma box office collection day 1
Thamma CollectionSAAM TV
Published On
Summary

रश्मिका मंदानाचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'थामा' रिलीज झाला आहे.

'थामा'मध्ये रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना एकत्र झळकले आहेत.

'थामा'ने अहान पांडेच्या सैयाराला मागे टाकले आहे.

21 ऑक्टोबरला साउथ अभिनेत्री रश्मिका मंदानाचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'थामा' (Thamma) रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याचे दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 'थामा'ने अहान पांडे आणि अनीता पड्डाच्या सैयाराचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. पहिल्याच दिवशी कलेक्शनमध्ये 'थामा'ने सैयाराला मागे टाकले आहे. 'थामा'चे ओपनिंग डे चे कलेक्शन (Box Office Collection) जाणून घेऊयात.

'थामा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

'थामा' चित्रपटातून पहिल्यांदाच रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'थामा' हा हॉरर-कॉमेडी- लव्ह स्टोरी चित्रपट आहे. या चित्रपटातील गाणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. चित्रपटातील आयुष्मान आणि रश्मिकाच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

'सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाच्या 'थामा' चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 24 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'थामा' ने अहान पांडेच्या 'सैयारा'चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'सैयारा' चित्रपटाने पहिल्या दिवशी 21 कोटी रुपयांची कमाई केली होती. या तुलनेत 'थामा' ने 3 कोटींची जास्त कमाई केली आहे. आता 'थामा' वीकेंडला किती कोटी कमावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'थामा' चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. या चित्रपटात रश्मिका, आयुष्मानसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तसेच चित्रपटात सप्तमी गौड़ा, डायना पेंटी, वरुण धवन, संजय दत्त, अपारशक्ती खुराणा असे अनेक कलाकार आहेत.

Thamma box office collection day 1
Hardeek Joshi-Akshaya Deodhar : राणादा अन् पाठकबाईंनी दिली गुडन्यूज, घरात आला नवा सदस्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com