हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे.
'तुझ्यात जीव रंगला'मधून यांना लोकप्रियता मिळाली.
राणादा अन् पाठकबाईंनी नुकतीच चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतून राणादा आणि पाठकबाईंची जोडी सुपरहिट झाली. राणादाच्या भूमिकेत अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठकबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) झळकली होती. या जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांना साथ देत आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी 2022मध्ये लग्नगाठ बांधली.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या लाडक्या राणादा आणि पाठकबाईं चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यांच्या घरात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे. ही आनंदाची बातमी हार्दिक जोशीने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. हार्दिक जोशीने दिवाळीला नवीन लग्जरी कार खरेदी केली आहे. कारचा व्हिडीओ टाकून त्याने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. "दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आमच्या कुटुंबात आणखी एक "BEAST" जोडला गेला..." असे कॅप्शन हार्दिकने व्हिडीओला दिले आहे.
राणादाने आलिशान महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) कार खरेदी केली आहे. या कारची किंमत जवळपास 20 लाखांच्या वर आहे. हार्दिक जोशीने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून कमेंट्सचा, कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अलिकडेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर 'आम्ही सारे खवय्ये' या कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळाले. सप्टेंबर महिन्यात हार्दिक जोशीचा 'अरण्य' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोघांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.