PM Modi : इतके एनर्जेटिक कसे काय? बिल गेट्स यांच्या प्रश्नावर PM मोदींनी दिलेलं उत्तर वाचायलाच हवं!

Narendra Modi - Bill Gates Meet : दिवसभर काम करूनही इतकी एनर्जी कशी राहते? या बिल गेट्स यांनी विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले उत्तर एकदा वाचायलाच हवं.
Narendra Modi - Bill Gates on Health, Fitness
Narendra Modi - Bill Gates on Health, Fitness SAAM TV

Narendra Modi - Bill Gates :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यात अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), आरोग्य, हवामान आणि रिसायकलिंगसह विविध महत्वाच्या मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात मेहनती नेत्यांपैकी एक आहेत, असे कौतुकोद्गार यावेळी गेट्स यांनी काढले. दिवसभर इतकं काम करूनही प्रचंड ऊर्जा कशी राहते, असा प्रश्न गेट्स यांनी विचारला. त्यावर मोदींनीही 'फिटनेस सिक्रेट' उलगडून सांगत सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बिल गेट्स यांनी अनेक प्रश्न विचारले. दिवसभर काम केल्यानंतरही इतक्या प्रचंड प्रमाणात ऊर्जेची पातळी कशी टिकवून ठेवता? विश्रांतीसाठी नेमकं काय करता? असा प्रश्न गेट्स यांनी विचारला. त्यावर माझ्यासाठी विश्रांती 'ऑटोपायलट मोड' वर असते. माझ्या शिक्षकांनी मला शिकवलेल्या अध्यात्मिक अभ्यासाच्या माध्यमातून आंतरिक शांती म्हणजेच मनःशांती मिळते. त्यामुळेच मी एनर्जेटिक असतो. ही ऊर्जा शारीरिक शक्तीतून नव्हे तर, माझं समर्पण आणि काम करण्याच्या भावनेतून उत्पन्न होते, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'माझ्या शरीराला कमी विश्रांतीची सवय लागलेली आहे. मी खूप कमी झोपतो. रात्री उशिरापर्यंत मी काम करतो. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठतो. ताजेतवाने वाटते. मला विश्रांतीसाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागत नाहीत. ते सर्व ऑटोपायलट मोडवर होतं.'

Narendra Modi - Bill Gates on Health, Fitness
Breaking News: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; मोदी, शहा, गडकरींच्या नावाचा समावेश

मोदींनी यापूर्वीही फिटनेस आणि आपल्या रुटिनविषयी सांगितलं आहे. त्यांच्या दिवसाची सुरुवात 'योग'ने होते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही उत्तम राहते, असंही त्यांनी सांगितलं होतं. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यानं काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या एका मुलाखतीतही दररोजच्या रुटिनवर सविस्तर सांगितलं होतं. सकाळी डोळे उघडताच माझे पाय जमिनीवर असतात. मला तीन तासांपेक्षा जास्त काळ झोप लागत नाही. मी पहाटे लवकर झोपेतून जागा होतो आणि दिवसाची सुरुवातच ३० ते ४५ मिनिटे योग आणि ध्यानधारणेनं होते, असं त्यांनी सांगितलं होतं.

Narendra Modi - Bill Gates on Health, Fitness
Narendra Modi News: पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; १ एप्रिलला मुंबईत येणार, हे आहे खास कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com