Breaking News: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; मोदी, शहा, गडकरींच्या नावाचा समावेश

BJP Lok Sabha Election 2024: भाजपने मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी आपल्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
PM Modi, Amit Shah, J. P. Nadda
PM Modi, Amit Shah, J. P. NaddaSAAM TV

BJP Star Campaigners Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. अशातच भाजपने मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी आपल्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Modi, Amit Shah, J. P. Nadda
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार? ईडीच्या अटकेविरोधात आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी

भाजपने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांच्या नावाचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)

विशेष बाब म्हणजे, विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या किंवा सध्याच्या लोकसभा निवडणुकीत तिकीटही न मिळालेल्या राज्यांतील स्टार प्रचारकांच्या यादीत काही नावे आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी २५ दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशात १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.  (Latest Marathi News)

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, नावे वाचा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आल आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे.

दुसरीकडे, विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रत्येक राज्यांमध्ये जाऊन सभा घेणार आहेत. तसेच शक्तीप्रदर्शन देखील करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com