Akshay Kelkar Lovestory Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kelkar Lovestory: तिच्या गाण्यात रमलो, फेसबुकवर बोलणं, बस स्टॉपवर भेट; बिस बॉस फेम अक्षय-रमाची हटके लव्हस्टोरी

Akshay Kelkar And Wife Rama Lovestory: बिग बॉस विजेता अभिनेता अक्षय केळकर लवकरच लग्न करणार आहे. अक्षयच्या होणाऱ्या बायकोचं नाव साधना आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande

बिग बॉस विजेता अभिनेता अक्षय केळकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अक्षय केळकर साधना काकतकरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अक्षयची होणारी बायको ही गायक आहे. तिचा आवाज खूप सुंदर आहे. अक्षय आणि त्याची गर्लफ्रेंड १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

अक्षयने बिग बॉसमध्ये असताना गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं होतं. अक्षय साधनाला लाडाने रमा असं म्हणतो. अक्षय आणि साधना गेल्या १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अक्षय आणि साधना म्हणजे रमाची भेट सर्वात आधी एका एकांकिकेत झाली होती. यामध्ये साधना गाणं गायची. त्याचवेळी अक्षयने लग्न करेन तर हिच्याशी, असं ठरवलं होतं. त्यानंतर अक्षयने साधनाला फेसबुकवर मेसेज केला. त्यावेळी साधनाने काहीच रिप्लाय दिला नाही. त्यानंतर त्याने तिला तुझा परत कधी कार्यक्रम असेल तर सांग असं सांगितलं त्यावर ती हो म्हणाली.

एकदा अक्षय एका सप्ताहला गेला होता. तिथे साधनादेखील आली होती. या कार्यक्रमात तिचे वडील गाणे गात होती. या ७ दिवसांमध्ये साधना आणि अक्षयची ओळख झाली. त्यानंतर त्यांचं बोलणं सुरु झालं. व्हॉट्सअॅपवर बोलले. तेव्ही अक्षयने तू मला आवडतेस, असं तिला सांगितलं. यावर साधनाने वा खूपच छान असं उत्तर दिलं. यानंतर दीड महिना गेला. दोन वेळा साधनाने त्याला नकार दिला होता. त्यानंतर अक्षयने तिच्याशी बोलणं सोडलं होतं.

बस स्टॉपवर पहिली भेट

एके दिवशी साधनानेच त्याला मेसेज केला. आपण भेटूया का असं विचारलं. आपण मित्र म्हणून बोलू शकतो की असं म्हटलं. त्यावर तो म्हणाला मित्र म्हणून माझ्याशी बोलायला खूप जण आहे. यानंतर आम्ही पहिल्यांदा बस स्टॉपवर भेटलो. त्यावर ती खूप साधे कपडे घालून आली होती. त्यावर तु अशी कशी येऊ शकते असं अक्षय तिला म्हणाला. त्यावेळी ती म्हणाली मी महत्त्वाची आहे की आणखी काय? यानंतर साधनानेच त्याला प्रपोज करण्यासाठी भाग पाडले. यानंतर त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. आता लवकरच ते लग्न करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT