Who is Amol Kale: पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज करणारा अमोल काळे कोण?

Minister Pankaja Munde : अमोल काळेला पुण्यातील भोसरी परिसरातून अटक करण्यात आलीय. अमोल काळे हा मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज करायचा.
Minister Pankaja Munde
Who is Amol Kalesaam Tv
Published On

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडेंना वारंवार अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आणि सतत फोन कॉल करून त्रास देणाऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आली. मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज करणारा व्यक्ती नेमका कोण आहे? याबाबतची नवी अपडेट माहिती समोर आलीय.

पुण्यातून अटक केलेल्या तरूणाचे नाव अमोल काळे असं आहे. अमोल काळे परळीचा असून तो शिक्षणासाठी पुण्यात आला होता. अमोल असे मेसेज का करत होता? त्यामागील कारणस काय याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान आरोपीला पोलिसांनी आज कोर्टात हजर केले, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर अमोल काळे कोण आहे, तो काय करत होता? याची ए टू झेड माहिती समोर आलीय.

Minister Pankaja Munde
Nashik Accident : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; भीषण अपघातात भावासमोर बहिणीने जीव सोडला

पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज करणारा अमोल काळे परळी येथील रहिवासी आहे. अमोल काळे हा पुण्यात शिक्षण घेत होता. सायबर विभागाने अमोलला पुण्यात अटक केली. अमोल काळेच्या विरोधामध्ये सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम 78 आणि 79 तसंच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. अमोलने पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज आणि त्यांच्या संदर्भात व्हिडिओ पाठवले होते. बीडच्या सायबर पोलिसात आरोपी अमोल काळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Minister Pankaja Munde
Raigad Guardian Minister : गावगुंडगिरी करतो ती...रायगडच्या पालकमंत्रिपदावरील संजय राऊतांच्या टीकेला गोगावलेंचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी येथून अमोल काळेला बेड्या ठोकल्या. पंकजा मुंडेंना काही दिवसांपासून सातत्याने त्रासदायक कॉल आणि आक्षेपार्ह मेसेज येत होते. याप्रकरणी भाजपचे महाराष्ट्र कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (वय २६) यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली.

निखिल भामरे याच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपी अमोल काळेला पुण्यातील भोसरी येथून ताब्यात घेतले. आरोपी काळे याने आपला गुन्हा कबूल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com