
सचिन कदम, रायगड | साम टीव्ही
महाराष्ट्रदिनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मुख्यालयात आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तर भरत गोगावले यांनीही महाडमध्ये ध्वजवंदन केले. यावरून चर्चा रंगली असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गोगावलेंना चिमटा काढला. त्याला गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पालकमंत्री कोण हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. मंत्री केले त्याला संजय राऊत हे गावगुंड म्हणत असतील, तर चांगली बाब आहे, असं गोगावले म्हणाले.
पालकमंत्री ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे. संजय राऊत कोण? त्यांनी त्यांच्या आघाडीचं बघावं. आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नये, असं प्रत्युत्तर मंत्री भरत गोगावले यांनी दिलं. रायगडचे पालकमंत्रिपद गावगुंडांकडे नसावं. आदिती तटकरे यांच्याकडे हे पद आलं तर स्वागत करतो, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर गोगावले बोलत होते.
त्यांच्याकडे (Sanjay Raut) काही मुद्दे राहिले नाहीत म्हणून भरतशेठ दिसतोय. कोण साव आणि कोण गावगुंड हे जनता ठरवेल. जनतेने सलग चार वेळा निवडून दिलं. मंत्री केलं. त्याला संजय राऊत गावगुंड म्हणत असेल तर चांगली बाब आहे. आम्ही जी काही गावगुंडगिरी करतो ती जनतेसाठी. त्यांच्या विकासकामांसाठी. त्यांच्यासारखं स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. त्यांनी आघाडीकडे पाहावं. आमच्या युतीकडे नाही, असा सल्ला गोगावले यांनी संजय राऊत यांना दिला.
महाराष्ट्रदिनी रायगड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदनाचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला होता. यावरून मानापमान नाट्य रंगलं होतं. खासदार संजय राऊत यांनी गोगावलेंवर टीका केली. आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत. या महाराष्ट्रातील युवा नेतृत्व आहे. त्यांना जिल्हा पूर्णपणे माहिती आहे. त्या संयमी आहेत, भ्रष्ट नाहीत आणि आता जे काही प्रगती पुस्तक आले आहे, त्यात त्यांना सर्वात जास्त मेरीट आणि ग्रेट्स मिळाले आहेत. रायगडसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे गावगुंडाकडे असता कामा नये. कोणत्याही अत्यंत संयमाने काम करणाऱ्या व्यक्तीकडे असले पाहिजे. जो भ्रष्टाचाराविरुद्ध ठामपणे उभा राहील. मला असं वाटतं की हा चांगला चेहरा आहे. त्यांच्याकडे ते जर आलं असेल तर मी स्वागत करतो, असे संजय राऊत म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.