

खासदार संजय राऊत. घराघरात परीचित असणारा आक्रमक राजकीय चेहरा. ठाकरे सेनेची बुलंद तोफ. शिवसेना फुटल्यानंतर पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर विरोधकांनी केलेला प्रत्येक वार आपल्या रोखठोक, तर कधी मिश्किल शैलीत परतवून लावणाऱ्या राऊतांचे सगळीकडे चाहते आहेत. मात्र खुद्द बच्चन कुटुंबातल्याच सदस्याला त्यांची शैली आवडते. हो हे खरं आहे.
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे जगभर अनेक चाहते आहेत. परंतु त्यांची मुलगी श्वेता बच्चन या संजय राऊत यांच्या चाहत्या असल्याची चर्चा रंगलीय. रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात ठाकरे आणि बच्चन कुटुंबीय एकत्र दिसले. यावेळी जया बच्चन यांनी राऊतांना भाऊ म्हणून हाक मारत थांबवलं आणि श्वेताला भेटलात का? अशी विचारणा केली. यावेळी रश्मी ठाकरे आणि अनिल अंबानीही उपस्थित होते. नक्की काय घडलं पाहा.
पत्रकार असलेल्या राऊतांची लेखणी तळपत असतेच. मात्र अगदी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत त्यांची चौफेर टोलेबाजी असते. बड्या सत्ताधारी नेत्यांनाही न घाबरता शिंगावर घेणारे राऊत त्यांच्या शैलीमुळे लोकप्रिय आहेत. याच राऊतांना बऱ्याचदा विरोधक सकाळचा भोंगा म्हणून हिणवतात. मात्र 2019 मध्ये मविआची सत्ता स्थापनेच्या घडामोडींच्या वेळी राऊतांनी माध्यमांसमोर मांडलेली बाजू कोणीच विसरु शकत नाही. मध्यंतरी मोठ्या आजारामुळे त्यांनी काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा जोमाने ते माध्यमांसमोर आले आहेत. त्यांची लढवय्या वृत्ती, ठाकरे कुटुंबाशी असलेली निष्ठा अनेकांना भावते. कडवट शिवसैनिक असलेल्या राऊतांचे त्यामुळेच सामान्य माणसापासून ते सेलिब्रेटींपर्यंत चाहते आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.