'बिग बॉस मराठी 5'मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या तिच्या कामामुळे चांगलीच चर्चेत आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी लोकप्रियता 'बिग बॉस मराठी 5'मधून मिळाली आहे. 'बिग बॉस' मधील तिचा गेम चाहत्यांना खूप आवडला आहे. आता तिने तिचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. ज्याचा खास व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने एक आलिशान कार खरेदी (Jahnavi Killekar Buys New Car) केली आहे. ही आनंदाची बातमी तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. आपल्या नव्या गाडीची तिने झलक दाखवली आहे. तिने या व्हिडीओला खूपच खास कॅप्शन दिलं आहे. तिने पहिल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की,"माझे नवीन मोठे खेळणे...माझे फुलपाखरू..." तर दुसऱ्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की,"एका नवीन प्रवासासाठी एक नवीन कार..." सध्या तिच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी किल्लेकर Mahindra XUV700 ही लग्जरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत जवळपास 25 ते 26 लाख रुपये आहे. जान्हवीने ब्लॅक रंगाची सुंदर कार खरेदी केली आहे.
जान्हवी किल्लेकर गाडीची खरेदी करण्यासाठी सहकुटुंब शोरुममध्ये गेली होती. व्हिडीओमध्ये ती गाडीची पूजा करताना देखील दिसत आहे. अलिकडेच जान्हवी 'अबोली' या मालिकेत पाहायला मिळाली होती. तसेच सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटातील 'वाजीव दादा' या गाण्यात पाहुणी कलाकार म्हणून झळकली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.