सन्मान! गायिका साधना सरगम, के. एस. चित्रा यांना कलागौरव पुरस्कार

Sadhana Sargam and K S Chithra : पद्मभूषण के. एस. चित्रा आणि पद्मश्री साधना सरगम यांना स्व. राम कदम कलागौरव जाहीर झाला आहे. पुण्यातील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Sadhana Sargam and K S Chithra
Sadhana Sargam and K S Chithrasaam tv
Published On

पुण्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पंधराव्या स्व. राम कदम कलागौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पद्मभूषण के. एस. चित्रा आणि पद्मश्री साधना सरगम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी 1 लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुणे येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिली.

संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या आणि दिग्गज, प्रसिद्ध कलाकारांना स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. गेल्या वर्षीच्या समारोहात महिला गायिकांना पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे पुरस्कारासाठी पार्श्वगायिका पद्मभूषण के. एस. चित्रा व पद्मश्री साधना सरगम यांची निवड करण्यात आली आहे.

यंदा पुरस्कार महिला कलाकारांना देण्यात येणार असल्यामुळे पुरस्कार वितरणाचे व्यासपीठ महिलांसाठी असणार आहे.

मराठी चित्रपट गीतांचे जादूगार आणि लावणी गीतांचे शहेनशहा मानल्या जाणाऱ्या संगीतकार स्व. रामभाऊ कदम यांच्या नावाने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणेतर्फे 2006 पासून स्व. राम कदम कलागौरव पुरस्कारने संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व दिग्गज कलाकारांना गौरवण्यात येत आहे.

आतापर्यंतचे पुरस्काराचे मानकरी

आजपर्यंत जगदीश खेबुडकर (2006), भास्कर चंदावरकर (2007), इनॉक डॅनियल्स (2008), सुलोचनाबाई चव्हाण (2009), चंद्रशेखर गाडगीळ (2010), अजय-अतुल (2011), उषा मंगेशकर (2012), अशोक पत्की (2013), सुरेश वाडकर (2014), यशवंत देव (2015), अरुण दाते (2016), अनुराधा पौडवाल (2017), राहुल देशपांडे, शंकर महादेवन (विभागून) (2020), अनुप जलोटा, जावेद अली (विभागून) (2023) यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

कोण आहेत पद्मभूषण के. एस. चित्रा?

संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात के. एस. चित्रा यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध गायक स्व. कृष्णन नायर यांच्या त्या कन्या. प्रा. डॉ. के. ओमान कुट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कर्नाटक शास्त्रीय संगीताचे शिक्षण पूर्ण केले. सिंधू भैरवी गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सहा राष्ट्रीय पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांनीही त्यांना सन्मानित केले आहे. चित्रा यांनी भारतीय विविध भाषांमधील 15 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत.

Sadhana Sargam and K S Chithra
National Awards 2024: राष्ट्रीय पुरस्कारामध्ये 'मराठी'चा डंका! 'वाळवी' अन् 'वारसा' चित्रपटाने उमटवली मोहर; PHOTO

कोण आहेत पद्मश्री साधना सरगम?

गायनाचा वारसा आई निला घाणेकर यांच्याकडून मिळाला. पंडित जसराज यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. गुरू कल्याणजी आनंदजी यांच्या मार्गदर्शनाखली पार्श्वगायनाची सुरुवात केली. तमिळ भाषेतील गाण्याकरीता पहिला राष्ट्रीय पुरस्कार 2001 मध्ये मिळाला. उत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून साधना सरगम यांना 55व्या फिल्म फेअर पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरवण्यात आले आहे. व्ही. शांताराम पुरस्कार, संवेदना प्रतिष्ठान, सहयोग फाऊंडेशनतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे.

Sadhana Sargam and K S Chithra
Sharvari Wagh Award: मराठमोळ्या शर्वरी वाघचा जलवा; ठरली उत्कृष्ट अभिनेत्री

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com