Bigg Boss Marathi 6 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : पुन्हा राडा होणार, खेळ रंगणार; बिग बॉस मराठीचा नवी सीझन येतोय? 'त्या' VIDEO नं इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ

Bigg Boss Marathi 6 Promo : 'कलर्स मराठी' वाहिनीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओ पाहून 'बिग बॉस मराठी 6' सुरू होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Shreya Maskar

हिंदी 'बिग बॉस 19' चा लवकरच ग्रँड फिनाले पार पडणार आहे.

सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी 6' सुरू होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

'कलर्स मराठी' वाहिनीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या सर्वत्र 'बिग बॉस 19' ची चर्चा पाहायला मिळत आहे. लवकरच हिंदी 'बिग बॉस 19' चा लवकरच ग्रँड फिनाले पार पडणार आहे. चाहते बिग बॉसचा विजेता कोण होणार, हे जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. अशात सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. 'कलर्स मराठी' वाहिनीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे सर्वत्र बिग बॉस मराठीचा नवीन सीझन येणार असल्याचे बोले जात आहे.

नुकताच 'कलर्स मराठी' वाहिनीने एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात "उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येतंय" असे लिहिलेले पाहायला मिळत आहे. तसेच व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचणार, उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येणार!" या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंट्समध्ये फक्त बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चर्चा पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस मराठी 5' खूप गाजला. या पर्वाचे होस्टिंग बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुखने केले. 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हण झाला आहे. सूरजला बिग बॉसमुळे खूप लोकप्रियता मिळाली. त्याचा 'झापुक झुपूक' चित्रपटही आला. तसेच सूरज आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अद्याप 'बिग बॉस मराठी 6' या नव्या सीझनची अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र प्रेक्षक मराठी बिग बॉससाठी खूपच उत्सुक आहेत.

आज संध्याकाळी या व्हिडीओ मागचा खरा अर्थ समजणार आहे. तसेच जर 'बिग बॉस मराठी' चा नवा सीझन येत असेल तर या सीझनचे होस्टिंग कोण करणार? नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार हे सर्व पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Union Budget 2026: यंदा देशाचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? वाचा तारीख आणि वेळ

Buldhana : पालकमंत्री मराठा असल्याची लाज वाटते ,महेश डोंगरेंचा संताप; जिजाऊ जन्मोत्सवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष..

Navi Mumbai: नवी मुंबईत शिंदेंच्या शिंवसेनेला खिंडार, बड्या नेत्यासह २० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Oscar: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका; 'कांतारा चॅप्टर १' आणि 'तन्वी द ग्रेट' ऑस्करच्या स्पर्धेत

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जाहीरनाम्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रकाशन

SCROLL FOR NEXT