Bigg Boss Marathi Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : रक्षाबंधनाच्या दिवशी बहीणभावाच्या नात्यात फूट; घन:श्याम-निक्कीमध्ये भांडण, घरात नेमकं काय घडलं? VIDEO

ghanshyam darwade and nikki tamboli : : रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण-भावाच्या नात्यात फूट पडली आहे. घरामध्ये घन:श्याम दरवडे आणि निक्कीमध्ये कडाक्याचं भांडण झालं आहे. दोघांमध्ये नेमकं काय घडलं, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : 'बिग बॉस मराठी ५' शोला तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. या खेळात दिवसेंदिवस रंगत वाढू लागली आहे. या घरात काही सदस्यांची मैत्री घट्ट होऊ लागली आहे. तर काही जण मनमोकळेपणाने व्यक्त होत आहे. तर काही सदस्यांमध्ये भांडणही होऊ लागले आहे. या भांडणात आज आणखी भांडणाची भर पडणार आहे. 'कलर्स मराठी'ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये छोटा पुढारी आणि निक्की तांबोळीमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं दिसत आहे. या भांडणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

'बिग बॉस मराठी ५' शोमध्ये रंगत वाढल्याने सूरज चव्हाण, छोटा पुढारी आणि निक्की तांबोळीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या शोमध्ये गेल्या काही दिवसांत घन:श्याम दरवडे उर्फ छोटा पुढारी आणि निक्की तांबोळीमध्ये मैत्री वाढली होती. काही दिवसांपूर्वी छोटा पुढारी आणि निक्कीच्या एकाच सोफ्यावर बसून चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. दोघांमध्ये रंगलेला संवादही जोरदार चर्चेत आले होते. दोघांच्या मैत्रीनंतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्येही दबक्या आवाजात मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी वेगळं असल्याचं म्हटलं जात होतं.

निक्कीने घन:श्यामला किस केल्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे या चर्चांना जोरदार उधाण आलं होतं. या सर्वांवर छोटा पुढारीची आईने माध्यमांना भावनिक प्रतिक्रिया दिली होती. घनश्यामची आईने म्हटलं होतं की, 'दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. दोघांमध्ये फक्त बहीण आणि भावाचं प्रेम आहे. लोकांना तो उगाच काहीतरी वेगळा विषय वाटत आहे'.

बहीण-भावाच्या नात्यात फूट

रक्षाबंधनाच्या दिवशी घन:श्याम आणि निक्कीच्या नात्यात फूट पडली आहे. निक्कीने छोट्या पुढारीला थेट फेक असल्याचं म्हटलं आहे.

'मी काय 'फेक' वागलो? तू किती 'होपलेस' आहेस, हे जनतेला दिसत आहे. तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला, निक्कूताई म्हणाल्याने घात झाल्याचे छोटा पुढारी म्हणाला. 'मला बहीणीच्या नात्याचा दर्जा देऊ नको. खोटा आहेस, बहीण-भावाच्या नात्याला कलंक असल्याचं निक्कीने म्हटलं. रक्षाबंधनाच्या दिवशी या दोघांमध्ये दरार आल्याने आज बिग बॉसच्या घरात त्यांच्यात नेमकं कशावरून वाजलं, हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, 'बिग बॉस मराठी ५' या शोचा आज चौथा आठवडा सुरु होणार आहे. या शोमधून रविवारी योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य घराबाहेर गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT