Raksha Bandhan 2024 : भाऊ आणि बहिणीचं पटत नाही; रक्षाबंधनच्या दिवशी करा 'हा' उपाय

Raksha Bandhan Brother and Sister Dispute How to Solve : रक्षाबंधन म्हणजे प्रत्येक भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करणे होय. आता बहीण तुमच्यापेक्षा वयाने मोठी असो अथवा लहान असो, तुम्हाला बहिणीला समजून घेणे गरजेचे आहे.
Raksha Bandhan Brother and Sister Dispute How to Solve
Raksha Bandhan 2024Saam TV
Published On

अनेकदा नात्यात विविध कारणामुळे दुरावा येतो. यात भाऊ आणि बहिणीचे नाते म्हणजे टॉम अँड जेरी सारखी गोष्ट असते. दोघांचे एकमेकांशी पटत नाही, मात्र दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाही. जसे जसे व्यक्ती मोठे होतात तसे तसे काहीवेळा वाद वाढतात.

Raksha Bandhan Brother and Sister Dispute How to Solve
Raksha Bandhan 2024 : लाडक्या भावाला मिळतील असंख्य लाभ! जाणून घ्या राखी बांधताना किती गाठी मारणे शुभ?

काही घरांमध्ये बहीण आणि भाऊ या दोघांमधील दरी प्रचंड वाढलेली असते. तुमच्या नात्यात सुद्धा अशी दरी वाढली असेल तर काय करावे? आपली बहीण किंवा भाऊ यांच्यात पुन्हा प्रेम निर्माण व्हावे यासाठी काय केले पाहिजे? याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

एक केमांची माफी मागा

रक्षाबंधन म्हणजे प्रत्येक भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करणे होय. आता बहीण तुमच्यापेक्षा वयाने मोठी असो अथवा लहान असो, तुम्हाला बहिणीला समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही बहिणीची ज्या कारणावरून वाद झाला आहे त्यासाठी माफी मागू शकता.

बहिणीला गिफ्ट घ्या

जर तुमची बहीण विवाहित असेल तर तिला तुम्ही सुंदर साडी गिफ्ट करू शकता. मात्र फक्त साडी न देता तुम्ही त्यासोबत बहिणीला सुंदर कानातले, बांगड्या किंवा मग छानशी नाकातील नथ सुद्धा गिफ्ट करू शकता.

बहिणीला घेण्यासाठी जा

बहीण ही आई प्रमाणे असते. त्यामुळे बहीण तुमच्यावर नाराज असेल तर तिला घ्यायला घरी जा. सासरी आपला भाऊ आपल्याला राखी पौर्णिमेसाठी घेऊन जायला आलेला आहे, हे पाहून बहिणीला फार आनंद होईल. तसेच सर्व राग आणि रुसवे फुगवे विसरून ती तुमच्याबरोबर येईल.

संवाद साधा

अशा कोणत्याही अडचणी नाहीत ज्या संवाद साधल्याने सुटत नाहीत. प्रत्येक वाद आणि प्रत्येक विषयातील भांडणे संवाद साधल्याने दूर होतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा संवाद साधून आपापसातील वाद दूर करू शकता.

आदर करा

प्रत्येक नात्यात आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमच्या बहिणीचा आणि भावाचा आदर केला पाहिजे. लहानांनी लहान मुलांसारखे आणि मोठ्यांनी मोठ्यांसारखे वागले पाहिजे.

Raksha Bandhan Brother and Sister Dispute How to Solve
Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनला बहिणींनी राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com