बिग बॉसच्या घरात हौदोस घालणाऱ्यांचे काही खरं नाही, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणाची घेणार शाळा?
Bigg Boss Marathi 5Canva

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरात मोठा धमाका होणार, रितेश देशमुखची गुगली कोणाचं टेन्शन वाढवणार?

Bigg Boss Marathi New Season Day 23 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सत्याचा पंचनामा होणार. आजच्या भागामध्ये सदस्यांमधील जबरदस्त कल्ला पाहायला मिळणार.
Published on

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन दणक्यात सुरू आहे. कार्यक्रमाच्या टीआरपीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता चौथा आठवडा सुरू झाला असून आज टीम A आणि टीम B अशा दोन गटांमध्ये 'सत्याचा पंचनामा' होणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कधी खरं बोलतील आणि कधी काय कोणापासून लपवतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे 'सत्याचा पंचनामा'मध्ये ते काय धमाका करणार हे पाहावे लागेल.

बिग बॉसच्या घरात हौदोस घालणाऱ्यांचे काही खरं नाही, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणाची घेणार शाळा?
Big Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की अन् योगिता भिडल्या; कोण होणार कॅप्टन

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कधी खरं बोलतील आणि कधी काय कोणापासून लपवतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे 'सत्याचा पंचनामा'मध्ये ते काय धमाका करणार हे पाहावे लागेल.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ,"आज होणार आहे सत्याचा पंचनामा", असं म्हटलं जात आहे. तर 'सत्याचा पंचनामा'मध्ये जान्हवी बसलेली असून 'बिग बॉस म्हणत आहेत,"आपण या खेळात निक्की यांची सावली आहात. आपलं स्वत:चं असं अस्तित्व नाही". त्यावर टीम B मधील सदस्य सहमती दर्शवतात.

'बिग बॉस मराठी'च्या घरात डीपी लावतोय आग

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात डीपी आग लावताना दिसत आहे. डीपी निक्कीच्या टीमला सांगतोय,"तुम्ही एखादी गोष्ट बोलता तेव्हा छोटा पुढारी मला ते येऊन सांगतोय. लहानसहान गोष्टी नकळत तो बोलून जातो. योगिता जाण्याआधी तिच्याजवळ येऊन तो बोलत होता,"ताई तू गेल्यावर मला कोणाचा आधार आहे". त्यावर योगिता म्हणाली होती,"मी याला कधी जवळ केलंय".

बिग बॉसच्या घरात हौदोस घालणाऱ्यांचे काही खरं नाही, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणाची घेणार शाळा?
Marathi Big Boss Fame Actor: बिग बॉस गाजवणाऱ्या अभिनेत्याचा झाला 'पुष्पा' सारखा अवतार;ओळखताही येईना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com