Aastad Kale Interview Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aastad Kale News : "नशीबाने अस्ताद नावाचा कोणीही सुलतान झालेला नाही...", नावावरून ट्रोलिंग होण्याबद्दल अस्ताद काळेचं परखड मत

Aastad Kale Interview : अभिनेता अस्ताद काळेने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने नावावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर आपलं परखड मत मांडलं आहे.

Chetan Bodke

सध्या सोशल मीडियावर मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर कमालीचा चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्याने आपल्या मुलाचं नाव 'जहांगीर' ठेवल्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. तब्बल ११ वर्षानंतर मुलाच्या नावावरून त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. चिन्मयला आणि त्याच्या परिवाराला मुलाच्या नावामुळे ट्रोल केल्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वीच तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असा निर्णय घेतला होता. अनेकांनी त्याच्या ह्या निर्णयावर नाराजी दर्शवली होती. अशातच आणखी एका अभिनेत्यानेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतंच मराठमोळा अभिनेता अस्ताद काळे याने 'आरपार' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने सध्या नावावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर आपलं परखड मत मांडलं आहे. अस्ताद काळे म्हणतो "नशीबाने अस्ताद नावाचा कोणीही सुलतान झालेला नाही. त्यामुळे ट्रोलिंगसाठी माझे आई- वडिल वाचले. नावाचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. गजानन नाव असणारा व्यक्ती गुन्हेगार नसू शकतो का? नावामध्ये कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही आपल्या मुलांवर कसे संस्कार करता, या गोष्टीवर अवलंबून असतं. प्रत्येक गोष्ट ही जात आणि धर्मावर न्यायची नसते. कोणतीही गोष्ट जात आणि धर्मावर नेणाऱ्या व्यक्तीची मनोवृत्ती फार वेगळी आहे."

"मी या गोष्टीवर माझी प्रतिक्रिया देणार नाही. मी या बाबतीत न्यूट्रल आहे. चिन्मय आणि नेहा हे दोघेही ती गोष्ट हँडल करण्यासाठी फार समजदार आहेत. मला इतका ट्रोलिंगचा सामना करावा लागला नाही, कारण त्यावेळी इतक्या धार्मिक भावना बोथट नव्हत्या. खरंतर माझं नाव पारसी किंवा पर्शियन आहे, हे अनेकांना माहिती नाही. आतापर्यंत तरी आस्ताद नावाचा कोणीही सुलतान किंवा जुलमी झालेला नाही. कदाचित जर पुढेही अस्ताद नावाचा सुलतान किंवा जुलमी समोर आला तर मलाही चिन्मयप्रमाणे ट्रोलिंग केलं जाईल." असं मुलाखतीत अस्ताद म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिकमधील अॅप आधारित रिक्षा आणि कॅब सेवा आज बंद

बाईकच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? 99% तुम्हाला माहिती नसेल उत्तर

Shocking: शाळेमध्ये २ विद्यार्थ्यांची आत्महत्या, गळफास घेत संपवलं आयुष्य; पालघर जिल्हा हादरला

Lack of sleep: नीट झोप होत नाही! आरोग्यासाठी ठरतेय सर्वात घातक, संशोधनातून समोर आली झोप उडवणारी माहिती

नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याच्या भाजपमध्ये हालचाली; राऊतांच्या दाव्यानं खळबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT