Sharmishtha Raut SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sharmishtha Raut : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला कन्यारत्न, लेकीच्या नावाचा अर्थ नेमका काय?

Sharmishtha Raut Daughter Name : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिच्या लेकीचे नाव काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला आहे. बिग बॉसमुळे लोकप्रियता मिळालेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut ) ही आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आजवर तिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर शर्मिष्ठा आई झाली आहे.

नुकतच शर्मिष्ठाने लेकीचे थाटात बारसे पार पाडले आहे. तिच्या बारशाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सोहळ्याला मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारमंडळींना उपस्थिती लावली होती. बारशाला शर्मिष्ठा आणि तिच्या नवऱ्याने मराठमोळा लूक केला होता. शर्मिष्ठाच्या नवऱ्याचे नाव तेजस देसाई असे आहे. दोघेही एकत्र खूपच छान दिसत होते.

लेकीचे नाव आणि नावाचा अर्थ

शर्मिष्ठा राऊतने आपल्या३ लेकीचे नाव 'रुंजी' असे ठेवले आहे. 'रुंजी' च्या नावाचा अर्थ स्पष्ट करत शर्मिष्ठा म्हणाली, "'रुंजी' (Runji ) म्हणजे अकस्मात सुंदर होय तर दुसरा अर्थ असा की, मनात सतत घोळत राहणे. एकदा तुम्ही रुंजीला पाहिलात आणि तिच्याशी संवाद साधलात तर तुमच्या मनातून ता जाणार नाही. "

शर्मिष्ठाचा लूक

लेकीच्या बारशाला आई-बाबा पारंपरिक अंदाजात पाहायला मिळाले. शर्मिष्ठानं पांढऱ्या आणि लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर तेजसने शर्मिष्ठाला मॅचिंग पांढऱ्या रंगाचा कुर्ता, धोती, पैठणीचं लाल रंगाचं जॅकेट परिधान केले होते. दोघे देखील खूपच सुंदर दिसत होते. सध्या या जोडप्यावर प्रेमाचा, शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. 2020 मध्ये शर्मिष्ठा आणि तेजस लग्नबंधनात अडकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT