CID : एसीपी प्रद्युमनपासून ते डॉ.साळुंके, कुणाला किती मानधन? सर्वात महागडा कलाकार कोण?

CID Cast Payment : सध्या सीआयडी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. सीआयडीतील पात्रांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. शोचे कलाकार किती मानधन घेतात जाणून घेऊयात.
CID Cast Payment
CIDSAAM TV
Published On

सध्या सीआयडी (CID) चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सीआयडी तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सीआयडीच्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील एसीपी प्रद्युमन, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत, सीनियर इन्स्पेक्टर दया पाहायला मिळत आहे. मात्र या सीझनची कथा थोडे हटके आहे. सीआडीच्या पात्रांना प्रेक्षक भरपूर प्रेम देत आहे. सीआयडीचे कलाकार एक एपिसोडसाठी किती मानधन घेतात हे मीडिया रिपोर्टनुसार जाणून घेऊयात.

सीआयडी मधील मुख्य पात्रांची खऱ्या आयुष्यातील नावे

  • एसीपी प्रद्युमन (ACP Pradyuman) - शिवाजी साटम (Shivaji Satam)

  • अभिजीत (Abhijeet) - आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava)

  • दया (Daya) - दयानंद शेट्टी (Dayanand Shetty)

  • डॉ. तारिका - श्रद्धा मुसले

  • डॉ. साळुंके - नरेंद्र गुप्ता

  • फ्रेडरिक्स - दिनेश फडणीस

सीआयडी मधील कलाकारांचे मानधन

  • शिवाजी साटम - एका एपिसोडसाठी 1 लाख रुपये

  • आदित्य श्रीवास्तव - 80,000 हजार रुपये

  • दयानंद शेट्टी - 85,000 हजार रुपये

  • दिनेश फडणीस - 70,000 हजार रुपये

सीआयडी मधील इतर पात्र नरेंद्र गुप्ता, श्रद्धा मुसले, अंशा सय्यद, जानवी छेडा, अजय नागरथ, वैष्णवी धनराज जवळपास एका एपिसोडसाठी 40,000 ते 50,000 हजार रुपये मानधन घेतात. सीआयडीने 20 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. कुछ तो गडबड हैं, दया तोड दो दरवाजा हे डॉयलॉग आजही लोकांच्य आवडीचे आहेत.

CID Cast Payment
Suraj Chavan : हापूस आंब्यांची मेजवानी अन् दाजींना केली खास विनंती; सूरज पोहचला अंकिता ताईच्या घरी, पाहा video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com