Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात होणार दूधावरून जोरदार राडा, कोण मारणार बाजी?

Bigg Boss Marathi Day 39 : 'बिग बॉस मराठी' च्या घरात सहाव्या आठवड्याला सुरुवात झाली असून आता नवीन राडा होणार आहे. दोन्ही टीममध्ये दूधासाठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे. रोज या शोचे अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. बिग बॉसच्या घरात रोज नवीन गोंधळ पाहायला मिळतो. यामुळे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन होते.

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi )च्या घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा धमाल राडा पाहायला मिळणार आहे. पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर ‘टीम A’ आणि ‘टीम B’ अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. परंतु गेल्या आठवड्यापासून वेगळ चित्र पाहायला मिळत आहे. सदस्यांमधील मैत्रीचं समीकरण बदलत जात आहे.

'बिग बॉस मराठी' च्या आजच्या भागात सदस्य घरामध्ये राडा करताना दिसणार आहेत. आज बिग बॉसच्या घरात जास्तीत जास्त दूध गोळा करताना चांगला कल्ला होणार आहे. कोणती टीम बीबी फार्ममधून दूध गोळा करण्यात बाजी मारेल याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे. या टास्कमध्ये घरातील सर्वच सदस्य जोरदार राडा करताना दिसणार आहेत. त्यांचा हा राडा रसिकांचे मात्र मनोरंजन करेल.

'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत हे सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या सात जणांमध्ये घराबाहेर कोण जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

SCROLL FOR NEXT