Natasa Stankovic : मुंबईत येताच नताशा पोहचली हार्दिक पांड्याची घरी, फोटो व्हायरल

Natasa Stankovic returns to Mumbai : नताशा स्टॅनकोविक मुलासोबत मुंबईला परत आली आहे. अगस्त्यसोबत धमाल व्हिडिओ हार्दिकच्या वहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Natasa Stankovic returns to Mumbai
Natasa StankovicSAAM TV
Published On

नुकताच क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर मुलगा अगस्त्य आई नताशासोबत परदेशी फिरायला गेला होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ नताशाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. आता घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मुलगा अगस्त्य मुंबईत परतला आहे. मुंबईत परतल्यानंतर अगस्त्य सर्वप्रथम आपल्या वडिलांच्या घरी म्हणजे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) घरी पोहचला.

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच आपल्या वडिलांपासून दीड महिना दूर होता. हार्दिकच्या वहिनीने म्हणजे पंखुरी शर्माने अगस्त्य आणि कवीर क्रुणाल पांड्यासोबत स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून ही बातमी दिली. व्हिडिओमध्ये हार्दिकची वहिनी पंखुरी अगस्त्य आणि कवीरसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. ती दोन्ही मुलांना जवळ घेऊन त्यांना गोष्टी सांगताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही मुलं खूप आनंदी दिसत आहे.

Natasa Stankovic returns to Mumbai
Kangna Ranaut: कंगना राणौत यांच्या Emergency ची रिलीज डेट लटकली, साऊथच्या 'या' दोन चित्रपटांना लागली लॉटरी

अगस्त्य दीड महिन्यांपूर्वी नताशासोबत सर्बियाला गेला होता. अगस्त्य आणि नताशा सर्बियाला गेल्यानंतर हार्दिकने त्याच्या आणि नताशाच्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली होती. तसेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याने 'नताशा आणि मी मुलगा अगस्त्यला एकत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.' असे सांगितले.

आयपीएलदरम्यान नताशा आणि हार्दिक यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. तसेच आता हार्दिकचे नाव जास्मिन वालियाबरोबर जोडले गेले. ते एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. हार्दिक आणि नताशा लग्नाच्या चार वर्षानंतर विभक्त झाले. यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती. जोडप्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये पुन्हा हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.

Natasa Stankovic returns to Mumbai
Actor Jr. NTR donated 1 crore : पूरग्रस्तांसाठी ज्युनिअर NTR बनला देवदूत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com