Actor Jr. NTR donated 1 crore : पूरग्रस्तांसाठी ज्युनिअर NTR बनला देवदूत

Actor Jr. NTR Donated to the Chief Minister's Relief Fund : आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पूरग्रस्तांना १ कोटीची देणगी दिल्याची ज्युनिअर NTR ने सोशल मिडियावरून पोस्ट केली आहे.
jr ntr donated in cm relief funds
jrntrINSTAGRAM
Published On

अभिनेता ज्युनिअर NTR च्या २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'देवरा : भाग १' ची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच ज्युनिअर NTRने एक माणुसकी जपणारी गोष्ट केली असल्याने त्याचे फॅन्स त्याचे तोंड भरून कौतुक सोशल मिडियावरून करत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पूरग्रस्तांना प्रत्येकी ५० लाख असे एकूण १ कोटीची देणगी ज्युनिअर NTR ने दिली आहे. यासंदर्भातील माहिती त्याने X वरून पोस्ट केली आहे.

अभिनेता ज्युनिअर NTR हा तेलगू चित्रपट विश्वातील एक नावाजलेला चेहेरा आहे. त्याचा चाहता वर्ग देखील संपूर्ण भारतात असल्याने त्याने दिलेले ही सामाजिक योगदान सामाजिक एकता दर्शविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारी आहे.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही राज्यांत आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटींनी या दुर्घटनेत मदतीचा हात पुढे केला असतानाच आता ज्युनियर एनटीआरने देखील मुख्यमंत्री मदत निधीला 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

ज्युनिअर NTR ने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीला ५० लाख रुपये आणि तेलंगणा मदत निधीला 50 लाख रुपये दिले आहेत. ज्युनियर एनटीआरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले की, 'दोन्ही राज्यांतील पूर आणि अतिवृष्टीमुळे मी अत्यंत चिंतेत आहे. मी देवाला प्रार्थना करतो की, लोकांना या दुःखद घटनेवर लवकर मात करण्याचे बळ द्यावे. दोन्ही राज्यांतील मदतीसाठी मी माझ्या बाजूने काही मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.

jr ntr donated in cm relief funds
IC 814 : OTT वर धुमाकूळ घालणाऱ्या वेबसीरीजवर बंदीची मागणी, 'ती' एक गोष्ट खटकली

'या' निर्मात्यानेही केली २५ लाखांची मदत !

दरम्यान, अभिनेता ज्युनिअर NTR पाठोपाठ कल्की 2898 AD या चित्रपटाच्या निर्मात्या आणि वैजयंती मुव्हिजच्या प्रमुख अश्विनी दत्त यांनी देखील आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपयांची देणगी दिली आहे. ही माहिती त्यांनी सोशल मिडियावरून दिली असून, '' या राज्याने आम्हाला खूप काही दिले आहे. आता या कठीण काळात साथ देण्याची आमची वेळ आहे.'' अशी पोस्ट शेअर केली आहे.

jr ntr donated in cm relief funds
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या लव्ह लाईफबद्दल माहितेय? डोंगरावर केलं होतं प्रपोज, I Love You ऐकून अभिनेत्यानं ठोकली होती धूम!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com