Bigg Boss Marathi 6  saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी ६’च्या ट्रॉफीवर ‘या’ सदस्याचे नाव? टॉप ५ स्पर्धकांची नावं समोर

Bigg Boss Marathi 6 Winner Name : रितेश भाऊंचा ‘बिग बॉस मराठी ६’ हा शो शेवटच्या टप्प्यावर आला आहे. ‘बिग बॉस मराठी ६’ विजेत्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Shreya Maskar

‘बिग बॉस मराठी ६’ ला टॉप ६ स्पर्धक भेटले आहेत.

‘बिग बॉस मराठी ६’ चा ग्रँड फिनाले काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

‘बिग बॉस मराठी ६’ चा विजेता म्हणून सोशल मीडियावर एकाच नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी ६’ चा ग्रँड फिनाले आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या शोकडे लागले आहे. या शोचे होस्टिंग बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुख याने केले. चाहते उत्सुकतेने शनिवार-रविवारची वाट पाहायचे, कारण रितेश भाऊ घरातील सदस्यांची शाळा घेण्यासाठी भाऊच्या धक्क्यावर यायचे. या सीझनमध्ये ‘नक्षीबाचे दार’ ही थीम होती. या सीझनमध्ये मराठी, हिंदी अभिनेते, अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांनी सहभाग घेतला होता. शेवटच्या भाऊच्या धक्क्यावर ड्रामा क्वीन राखी सावंतने घराचा निरोप घेतला. आता ‘बिग बॉस मराठी ६’ ची ट्रॉफी कोण उचलणार, जाणून घेऊयात.

टॉप ६ स्पर्धक

  • राकेश बापट

  • दीपाली सय्यद

  • तन्वी कोलते

  • अनुश्री माने

  • विशाल कोटियन

  • रेवा कौरासे

सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांनुसार विशाल कोटियन किंवा रेवा कौरासे यांची टॉप ५ मधून एक्झिट होऊ शकते. रेवा कौरासे ही वाइल्ड कार्ड स्पर्धक आहे. तर विशाल कोटियन ‘बिग बॉस मराठी ६’च्या पहिल्या दिवसापासून भन्नाट खेळताना दिसत आहे. तो टोळी गटात होता. विशाल कोटियन आणि रुचिता जामदार यांचा गेम बिग बॉसच्या घरात खूप गाजला. अलिकडेच राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात मोठी भांडणे झाली होती.

‘बिग बॉस मराठी ६’ चा विजेता कोण?

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये खूप तगडे स्पर्धक पाहायला मिळाले. बिग बॉसच्या पहिल्या- दोन आठवड्यानंतर विजेता म्हणून सोशल मीडियावर फक्त एकाच नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. तन्वी कोलके ‘बिग बॉस मराठी ६’ ची ट्रॉफी उचलणार असे सर्वत्र बोले जात आहे. तसेच काहींचा मते अनुश्री माने देखील बिग बॉसचा किताब जिंकू शकते. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. ग्रँड फिनालेला रितेश भाऊ ‘बिग बॉस मराठी ६’ चा विजेता घोषित करतील.

‘बिग बॉस मराठी ६’ चा ग्रँड फिनाले कधी पार पडणार?

मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच येणाऱ्या रविवारी थाटामाटात पार पडणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT