NCP Merger:राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार? दोन्ही गटांकडून आमदारांसोबत चर्चा सुरु

NCP Merger Buzz: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांचे विलिनीकरण होणार का? दोन्ही गटांतील नेते आणि आमदारांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील राजकीय हालचालींमागे नेमकं काय आहे?
Ncp Merger News: Will Sharad Pawar And Ajit Pawar Factions Reunite?
Ncp Merger News: Will Sharad Pawar And Ajit Pawar Factions Reunite?saam tv
Published On: 
Summary
  • विलीनीकरणाबाबत राजकीय हालचालींना वेग

  • दोन्ही गटांकडून आमदारांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू

  • महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.

राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी थेट राजधानी दिल्लीत हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादींवर कमालीचा दबाव टाकण्यात येतोय. यासाठी आता चर्चेच्या फेऱ्याही सुरू झाल्या आहेत. कोण आहे विलिनीकरणाच्या मागे? कुणी दिलाय विलिनीकरणाला ग्रीम सिग्नल? चर्चेसाठी दोन्ही पक्षांमधून कुणी पुढाकार घेतलाय? पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट.

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावणाऱ्या सुनील तटकरेंनी घूमजाव करत 7 नोव्हेंबरला दादांची विलिनीकरणाची इच्छा होती,असं वक्तव्य केलं आणि पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या. अशातच दादांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा पवारांच्या अपरोक्ष 2 नोव्हेंबरला गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं, अशी भाजपची इच्छा असून भाजप दिल्ली हायकमांडनं विलिनीकरणासाठी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दुसरीकडे विलिनीकरणासाठी राष्ट्रवादीचे आमदारही इच्छुक असल्याची चर्चा आहे.त्याचाही दबाव राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आहे.. दोन्ही गटांच्या पक्षातील आमदारांसोबत स्वतंत्र चर्चा सुरू आहेत. कारण विलिनीकरण झालं तर प्रत्येक मतदारसंघातील आमदाराचं राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे.

Ncp Merger News: Will Sharad Pawar And Ajit Pawar Factions Reunite?
Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात? महायुतीतील नेत्यांचाच खळबळजनक दावा

दरम्यान दादांच्या राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. भविष्यात भाजपला केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच मोदींनी शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यावर विचारपूस करताना. फोनवर सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू असं म्हणत अप्रत्यक्षपणे विलिनीकरणाचा प्रस्ताव ठेवल्याचं बोललं जातयंं.मात्र शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत, असं विधान ठाकरेसेनेच्या संजय राऊतांनी केलंय...त्यावर भाजपनेही राऊतांना चांगलचं प्रयुत्तर दिलयं.

Ncp Merger News: Will Sharad Pawar And Ajit Pawar Factions Reunite?
NCP Merger: राजकीय घडामोडींना वेग! पार्थ पवारांसह राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला; सिल्व्हर ओकवर खलबतं

विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना शरद पवारांनी मात्र अजूनही यासंर्दभातील आपली भूमिका जाहीर केलेली नाही अशातच प्रफुल्ल पटेलांनी रूग्णालयात 10 नोव्हेंबरनंतर पवारांच्या भेट घेण्याविषयी विचारणा केली आहे. आता भाजप आणि पक्षातील आमदारांचा वाढता दबाब लक्षात घेता सुनेत्रा पवार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी तयारी दर्शवणार का? आणि येणाऱ्या काळात शरद पवार मविआची साथ सोडून एनडीएमध्ये सहभागी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.