

पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
अजित पवार आणि शरद पवार गटाच्या विलीनीकरणाचा निर्णय होणार का?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून पवारांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेते सिल्वर ओक बंगल्यावर जमलेत. पार्थ पवारांसह दोन्ही राष्ट्रवादीचे नेते या बैठकीसाठी हजर असून गेल्या एक तासापासून ही बैठक सुरूय. राजकारणातील ही घडामोड पाहता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी शक्यता वर्तवली जातेय. (Ncp Merger Buzz: Parth Pawar And Ncp Leaders Meet Sharad Pawar At Silver Oak)
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर शरद पवार गट राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचे नेते सिल्वर ओक बंगल्यावर दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड सिल्वर ओकवर दाखल झालेत. तसेच अजित पवार गटाचे प्रमुख नेते पार्थ पवार सुद्धा सिल्वर ओक बंगल्यावर आलेत. या नेत्यांमध्ये गेल्या एक तासापासून बैठक सुरूय. पंरतु पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट पवारांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी की राजकीय? हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या तब्येतची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांची बैठक पुन्हा १० नोव्हेंबरला होणार असल्याचं त्या भेटीत ठरलं. दोन्ही राष्ट्रवादी या मनाने वेगळ्या नाहीत. १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होईल अशी माहिती पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दिली होती.
प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंनी विलीनीकरणावर भाष्य केलं. अजित पवार असते तर विलीनीकरणाचा निर्णय आधीच लागला असता. त्यामुळे दोन्ही राष्ट्र्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय.
दरम्यान शरद पवार रुग्णालयात अॅडमीट असताना पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. सुप्रिया सुळे या सक्षम असून आम्ही आणि सुप्रिया सुळे देश संभाळू. तु्म्ही मार्गदर्शन करा आणि तब्येतीची काळजी घ्या असं मोदी म्हणाले होते. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र होत ते एनडीएमध्ये सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.