Bigg Boss Marathi 6  saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : घरातल्यांनी केलं तन्वीला टार्गेट; थेट चोरीचा आरोप, बिग बॉसमध्ये मोठा राडा | VIDEO

Bigg Boss Marathi 6- Tanvi Kolte : बिग बॉसच्या घरात आणखी एक राडा झाला आहे. तन्वी कोलतेने घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. घरात नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरातून सोनाली राऊतचा पत्ता कट झाला.

बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा चोरी झाली आहे.

घरातील सदस्यांनी तन्वीवर चोरीचा आरोप केला आहे.

बिग बॉसच्या घरातून राधा पाटीलनंतर काल भाऊच्या धक्क्यावर सोनाली राऊतने घराचा निरोप घेतला आहे. बिग बॉसच्या घरात चौथ्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. नवीन आठवड्यात नवा वाद पाहायला मिळत आहे. कॅप्टनसह टास्कमध्ये बाजी मारणाऱ्या सदस्यांना गोल्डन रेशनकार्ड तर अन्य सदस्यांना सिल्व्हर किंवा ब्राँझ रेशन कार्ड मिळते. ज्यातून घरातील रेशनची विभागणी होते.

काही दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरात अनेक वेळा चोऱ्या झाल्या आहेत. घरातील सदस्य एकमेकांच्या लग्जरी वस्तू चोरताना दिसतात. ब्राँझ रेशनकार्ड असलेले सदस्य घरातील अन्य लोकांचं समान चोरी करतात. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा चोरी झाली आहे. घरातील सदस्यांनी तपास केल्यानंतर तन्वीच्या बेडजवळ रोशनला तांदूळ, चॉकलेट असे अनेक सामान मिळते. त्यामुळे घरातील सदस्य तिच्यावर चोरीचा आरोप करतात. ज्यामुळे तन्वी कोलते प्रचंड चिडते.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तन्वी ठामपणे सांगते की, मी चोरी केली नाही. मात्र तिची घरातील इतर सदस्यांसोबत भांडणे होतात. रागारागात तन्वी बोलते की, "पण मी नाही केलंय यार...शपथ सांगते हे सामान मी ठेवले... मला हा शो सोडायचा आहे... मला नाही करायचाय आता हा शो..." या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत.

बिग बॉसने या व्हिडीओला हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "सदस्यांनी केलेल्या चोरीच्या आरोपामुळे दुखावली गेली तन्वी..." आता तन्वीने खरीच चोरी केली आहे का? ती खरंच घर सोडून जाणार का? हे सर्व पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बिग बॉसचा खेळ दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा टीमची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा मिळवला जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT