Mahesh Babu Daughter : 13 वर्षांची सितारा मोठ्या बॉलिवूड Divas ना देतेय टक्कर; महेश बाबूच्या लेकीचा रॅम्पवर जलवा, पाहा VIDEO

Mahesh Babu Daughter Sitara Ramp Walk : साऊथ अभिनेता महेश बाबूच्या लेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ती रॅम्प वॉक करताना दिसत आहे.
Mahesh Babu Daughter Sitara Ramp Walk
Mahesh Babu Daughtersaam tv
Published On
Summary

साऊथ अभिनेता महेश बाबू 'वाराणसी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

महेश बाबूची लेक सिताराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सितारा व्हिडीओत सुंदर रॅम्प वॉक करताना दिसत आहे.

साऊथ अभिनेता महेश बाबू अनेक वेळा त्याची मुलगी सितारामुळे चांगलाच चर्चेत येतो. आता देखील सिताराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा घट्टामनेनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सिताराला आता फॅशन आयकॉन म्हणून ओळखले जाते. तिचा ज्वेलरी एक्झिबिशनमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ती रॅम्प वॉक करताना दिसत आहे.

अलिकडेच सितारा आई, अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत एका लग्जरी दागिन्यांच्या प्रदर्शनाला गेली होती. जिथे तिने आपल्या हटके स्टाइलने , साधेपणाने आणि रॅम्प वॉकने सर्वांना मोहित केले. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.नेटकरी केवळ सिताराच्या सौंदर्याचेच नव्हे तर तिच्या पोशाखाचे आणि रॅम्प वॉकचेही कौतुक करत आहेत. तिचा आत्मविश्वास कमालीचा आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये सितारा माजी मिस इंडिया नम्रता शिरोडकर यांच्यासोबत ज्वेलरी एक्झिबिशनच्या इव्हेंटमध्ये रॉयल एन्ट्री घेताना दिसत आहे. आई-मुलीची जोडी पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर चाहते, कलाकार भरभरून कमेंट्स करत आहे. तिच्या सौंदर्याचे, स्टाइलचे आणि फॅशनचे कौतुक करत आहेत. "भविष्यातील सुपरस्टार", "यंग फॅशनिस्ट", "आगामी मिस इंडिया", "स्टार" , "राजकुमारी" अशा कमेंटस येत आहेत.

व्हिडिओमध्ये सितारा आधुनिक कॉर्सेट-ड्रेप्ड कॉन्सेप्ट साडी गाऊन मध्ये दिसत आहे. त्यावरील नक्षीकाम खूपच सुरेख आहे. यामुळे एक शाही लूक सिताराला मिळाला आहे. 13 वर्षांच्या सिताराचा रॅम्प वॉक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. सिताराच्या चेहऱ्यावरील स्माइल खूपच भन्नाट आहे. 2005ला महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं आहेत. मुलगी सितारा आणि मुलगा गौतम होय.

Mahesh Babu Daughter Sitara Ramp Walk
Border 2 vs Mardaani 3 Collection : सनी देओलच्या 'बॉर्डर २'चं तिकिट खिडकीवर तुफान, ३०० कोटींचा गल्ला; वाचा राणीच्या 'मर्दानी ३'ची काय स्थिती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com