'मर्दानी 3' सिनेमा 30 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
'मर्दानी 3'मध्ये राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आहे.
'मर्दानी 3' चित्रपटात राणी मुखर्जीने शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारली आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट आमनेसामने पाहायला मिळत आहेत. राणी मुखर्जी 'मर्दानी 3' सिनेमा 30 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर सनी देओलचा 'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. रविवारी कोणत्या चित्रपटाने सर्वात जास्त कलेक्शन केले, जाणून घेऊयात.
'मर्दानी 3' चित्रपटाने तीन दिवसांत 15 कोटी रुपयांच्यावर कमाई केली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'मर्दानी 3' चित्रपटाने पहिल्या दिवशी 4 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 6.25 कोटी रुपये कमावले आहे. तर 'मर्दानी 3'ने रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी 7.25 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने तीन दिवसांत तब्बल 17.50 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वीकेंडला चित्रपटाने चांगलीच बाजी मारली आहे.
पहिला दिवस - 4 कोटी रुपये
दिसरा दिवस - 6.25 कोटी रुपये
दिवस तिसरा - 7.25 कोटी रुपये
एकूण - 17.50 कोटी रुपये
राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 3' चित्रपटाने पहिल्या रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी 7.25 कोटी रुपये कमावले आहेत. तर 2025 साली रिलीज झालेल्या काजोलच्या 'माँ'चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 7 कोटी रुपये कमावले. त्यामुळे, राणी मुखर्जीच्या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून काजोलच्या 'माँ' ला मागे टाकले आहे.
'मर्दानी 3' चित्रपटात राणी मुखर्जी, जानकी बोडीवाला आणि मल्लिका प्रसाद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'मर्दानी 3' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केले आहे. चित्रपटात राणी मुखर्जीने शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार,'बॉर्डर 2' चित्रपटाने 10 व्या दिवशी तब्बल 22.50 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 275.25 कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंह हे आहेत. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, परमवीर सिंह चीमा, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मेधा राणा आणि मोना सिंग झळकले आहेत. 'बॉर्डर 2' हा 1997 ला रिलीज झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.