Bigg Boss Marathi 6 : SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : प्राजक्ता शुक्रेने बिग बॉसला ठोकला रामराम, 'त्या' एका चुकीने थेट घराबाहेर जावे लागले

Prajakta shukre Eliminated From BB House : 'बिग बॉस मराठी 6'च्या घरातून प्राजक्ता शुक्रेची एक्झिट झाली. तिच्या घराबाहेर जाण्याने सदस्य खूप भावुक झाले.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात नवव्या आठवड्याचे एलिमिनेशन पार पडले.

प्राजक्ता शुक्रेने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला.

प्राजक्ताच्या एक्झिटमुळे सागर कारंडे खूपच भावुक झाला.

'बिग बॉस मराठी 6' चा (Bigg Boss Marathi 6) खेळ दिवसेंदिवस अधिक रंजक होत जात आहे. आता बिग बॉसचा दहावा आठवडा सुरू झाला आहे. नुकतेच नवव्या आठवड्याचे एलिमिनेशन पार पडले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे. नवव्या आठव्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी एकूण सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. यात संकेत पाठक, तन्वी कोलते, प्राजक्ता शुक्रे (Prajakta shukre) , दिपाली सय्यद, रेवा कौरासे आणि अनुश्री माने यांचा समावेश होता.

'बिग बॉस मराठी 6'च्या घरातून प्राजक्ता शुक्रेची एक्झिट झाली आहे. तब्बल दोन महिन्यांनी तिचा घरातला प्रवास संपला आहे. प्राजक्ता एलिमिनेशनमुळे घरातील सदस्यांना खूप वाईट वाटले आहे. प्राजक्ताचे एलिमिनेशन ऐकताच सागर कारंडे खूप भावुक होतो. रितेश देशमुखने प्राजक्ताला वेळोवेळी आपल्या गेमबद्दल सांगितले होते. प्रेक्षकांची कमी मते मिळाल्यामुळे प्राजक्ता शुक्रेला बिग बॉसचे घर सोडावे लागले.

'बिग बॉस मराठी 6'च्या संपूर्ण प्रवासात प्राजक्ताने आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली. ती गेले अनेक आठवडे सतत नॉमिनेट झाली होती. प्राजक्ता घरात वैयक्तिकरित्या गेम खेळताना दिसली. तिचे बिग बॉसच्या घरात करण सोनावणेसोबत चांगली नाते दिसले. प्राजक्ता शुक्रे 'बिग बॉस मराठी 6'ची पहिली कॅप्टन झाली होती. प्राजक्ता घरात कायम गॉसिफ करताना दिसली.

'बिग बॉस मराठी 6'च्या घरात राखी सावंतनंतर तीन वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्या आहेत. यात संकेत पाठक, संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे यांचा समावेश होता. राखी सावंतने तर 'बिग बॉस मराठी 6'चे घर डोक्यावर घेतले आहे. रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. या आठवड्यात संकेत पाठक बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन आहे. त्यामुळे त्याच्या कॅप्टन्सीमध्ये घरात कोणता राडा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT