बिग बॉसमध्ये रुचिता आणि करणमध्ये वाद होतात.
रुचिता पॉवर key गमावते.
रुचिता करणच्या पाया पडते, त्याच्या समोर हात जोडते.
'बिग बॉस मराठी 6'च्या घराचे दार उघडून आता तीन-चार दिवस उलटले आहेत. मात्र वादाची ठिणगी पहिल्याच दिवसापासून पडली आहे. घरात खेळाची रणनीति आखताना सदस्य दिसत आहेत. पहिल्या दिवशी तन्वीने घातलेला राडा यामुळे सध्या रुचिता जामदार सध्या चांगलीच चर्चेत आहे. अशातच आता बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या खेळाला कलाटणी देणारी 'पॉवर की' (Power Key) समोर आली आहे.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, बिग बॉस रुचिताला सांगतात, पॉवर चेंबरमध्ये येण्यासाठी पॉवर की गरजेची आहे. मात्र 'पॉवर की' चा वापर करताना रुचिताकडून काहीतरी चूक घडते. असे दिसते. या व्हिडीओ पोस्ट करून लिहिलं की, "पॉवर key ला हलक्यात घेणं, पडलं रुचिताला भारी..." आता पॉवर key मिळवण्यासाठी रुचिता करणला समजावताना दिसत आहे. पॉवर key रुचितासाठी धोक्याची ठरू शकते.
'बिग बॉस मराठी 6'ने शेअर केलेल्या व्हिडीओत रुचिता म्हणते की, "करण प्लीज चावी दे..." तेव्हा करण बोलतो," नाही देऊ शकत... " पुन्हा रुचिता म्हणते, "करण माझ्या स्वप्नासोबत नको खेळू ..." त्यावर करण बोलतो, "तू बिग बॉसना सांग की चावी करणने घेतली आहे..." तेव्हा रुचिता बोलते, "करण प्लीज माझ्याकडून चूक झाली..." पॉवर key मिळवण्यासाठी रुचिता करणच्या पाया पडली, त्याच्या समोर हात देखील जोडले.
आता पॉवर key रुचिताला मिळणार की नाही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रुचिताला आपल्या चुकीमुळे नॉमिनेशनमध्ये जावे लागणार असे दिसत आहे.'बिग बॉस मराठी ६' हा सीझन 100 दिवसांचा असणार आहे. यंदाची थीम 'दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार...' आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक आता वीकेंडला होणारा भाऊचा धक्का पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.