बिग बॉसच्या घरात कडाक्याचे भांडण होते.
राकेश अनुश्रीवर प्रचंड संतापतो.
बिग बॉस घरातील एका सदस्यासाठी दार उघडतात.
'बिग बॉस मराठी 6'च्या घरात नुकताच पहिला भाऊचा धक्का पार पडला. पहिल्या आठवड्यात 'बिग बॉस मराठी 6' च्या घरातून कोणताही सदस्य बाहेर गेला नाही. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अशात आता घरात नवा वाद सुरू झाला आहे. अनुश्रीच्या वागण्याने राकेशचे डोकं गरम झाले आहे. तर दुसरीकडे बिग बॉस घरातील एका सदस्यासाठी दार उघडे करतात. आता बिग बॉसच्या घरातून कोण जाणार पाहणे, महत्त्वाचे ठरणार आहे.
'बिग बॉस मराठी 6'च्या घरात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. नेहमी शांत राहणारा सदस्य राकेश बापट आज पहिल्यांदा घरात भांडताना दिसत आहे. तो अनुश्रीवर चांगलाच संतापला आहे. घरात बेडवरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की राकेशने थेट घर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये राकेशने घराबाहेर जाण्याचे म्हटल्यावर बिग बॉस दार उघडताना दिसत आहेत. संपूर्ण व्हिडीओत राकेशचा पारा चढलेला दिसत आहे.
अनुश्री - "मला कुणी नाही हलवू शकत माझ्या बेडवरून...जिथे तू मला हात धरून उठवलंस ना तेथेच तू माझ्या डोक्यात गेलास..."
राकेश - "हे बोलणं चुकीचं आहे... Do Not Dare To Say That Again. आयुष्यात मी एवढं 25 वर्ष काम केले आहे. कोणाची हिंमत आहे की, मला असं कुणी बोलेल. मला या घरात थांबायचे नाही..."
व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, "नेहमी Chill असलेल्या राकेशचं अनुश्रीमुळे डोकं झालंय गरम..." आता हा वाद निवळणार की राकेश खरोखरच घर सोडणार? या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहे. काही लोक अनुश्रीला मोठ्यांशी नीट वागण्याचा सल्ला देत आहेत. तर काहींना राकेशचा स्वभाव खटकला आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.