Raigad Tourism : समुद्रातील मराठा शौर्याचे प्रतीक; रायगडमध्ये लपलाय 'हा' किल्ला, वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Shreya Maskar

पद्मदुर्ग

पद्मदुर्ग हा 'कासा किल्ला' म्हणून ओळखला जातो. रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात पद्मदुर्ग किल्ला वसलेला आहे.

Padmadurg | google

उद्देश

पद्मदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 च्या दशकात सिद्दीच्या सागरी वर्चस्वाला शह देण्यासाठी आणि जंजिरा किल्ल्याला वेढा घालण्यासाठी बांधलेला महत्त्वपूर्ण जलदुर्ग आहे.

Padmadurg | google

कोळीवाडा

पद्मदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी मुरुड कोळीवाडा किंवा जवळच्या एकदरा गावातील खाडीकिनारून खाजगी बोटीने जाता येते. बोटीतून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Padmadurg | google

चुन्याचा वापर

पद्मदुर्ग किल्ल्याच्या तटबंदी बनवण्यासाठी सागरी लाटांचा मारा सहन करण्यासाठी बेसाल्ट खडक आणि अत्यंत मजबूत चुन्याचे मिश्रण वापरण्यात आले आहे.

Padmadurg | google

कासवाच्या पाठीसारखा

पद्मदुर्ग किल्ल्याला 'कासवाच्या पाठीसारखा' आकार असल्याने 'कासा किल्ला' असेही म्हणतात. इतिहासात या किल्ल्याचे मोठे महत्त्व आहे.

Padmadurg | google

17 वे शतक

पद्मदुर्ग किल्ला हा १७ व्या शतकातील समुद्री किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. रणनीतिक बेट स्थान, भव्यता, मजबूत बुरूज, प्राचीन तोफगोळे आणि विहंगम अरबी समुद्राचे दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Padmadurg | google

रायगड पर्यटन स्थळे

रायगड येथे रायगड किल्ला, मुरुड-जंजिरा, अलिबाग बीच, दिवेआगर, श्रीवर्धन बीच आणि कोलाड ही पर्यटन स्थळे आहेत.

Padmadurg | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Padmadurg | google

NEXT : अलिबागजवळील 'हा' सागरी किल्ला एकदा पाहाच, अरबी समुद्राच्या मनमोहक सौंदर्याच्या प्रेमात पडाल

Raigad Tourism | google
येथे क्लिक करा...