Raigad Tourism : अलिबागजवळील 'हा' सागरी किल्ला एकदा पाहाच, अरबी समुद्राच्या मनमोहक सौंदर्याच्या प्रेमात पडाल

Shreya Maskar

कोर्लई किल्ला

कोर्लई किल्ला १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला असून मुरुड-अलिबाग किनारपट्टीवर कुंडलिका नदीच्या खाडीच्या मुखाशी एका बेटावर वसलेला आहे. इतिहासात कोर्लई किल्ल्याला मोठे महत्त्व आहे.

korlai fort | google

दीपगृह

कोर्लई किल्ल्याजवळ जुने चर्च आणि दीपगृह पाहायला मिळते. कोर्लई किल्ला पोर्तुगीज, मराठा आणि इंग्रजी सत्तेचा साक्षीदार राहिला आहे.

korlai fort | google

इतिहास

कोर्लई किल्ला १५२१ मध्ये पोर्तुगीजांनी निजामशहाच्या परवानगीने बांधला. कोर्लई किल्ल्याला 'कोर्लई मोरो कॅसल' किंवा 'कॅसल कर्ल्यू' असेही म्हटले जाते.

korlai fort | google

समुद्र किनारा

कोर्लई किल्ला एका बाजूला जमीन असून उर्वरित तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात कोर्लई किल्ल्याला नक्की भेट द्या.

korlai fort | google

वैशिष्ट्ये

कोर्लई किल्ला महाराष्ट्रातील हा एकमेव किल्ला आहे जिथे आजही जुन्या चर्चचे अवशेष पाहायला मिळतात, असे बोले जाते.

korlai fort | google

अरबी समुद्र

कोर्लई किल्ल्याच्या तटबंदीवरून अरबी समुद्र आणि कुंडलिका खाडीचे विहंगम दृश्य दिसते. येथे तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता.

korlai fort | google

रायगड पर्यटन स्थळे

रायगड जिल्ह्यात रायगड किल्ला, मुरुड-जंजिरा, कोलाबा किल्ला, कर्नाळा किल्ला, अलिबाग, माथेरान, कोलाड ही पर्यटन स्थळे पाहायला मिळतात.

korlai fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

korlai fort | google

NEXT : किल्ले, राजवाडे, वाळवंट अन् संस्कृतीने नटलेली भूमी; राजस्थानला अनुभवा राजेशाही थाट, 'ही' ठिकाणे पाहायला विसरू नका

Rajasthan Tourism | yandex
येथे क्लिक करा...