Bigg Boss Marathi 6 Elimination Update
Bigg Boss Marathi 6saam tv

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घराला पहिल्याच आठवड्यात कोण करणार टाटा,बाय-बाय? रितेश भाऊंनी दिला मोठा धक्का

Bigg Boss Marathi 6 Elimination Update : 'बिग बॉस मराठी 6' च्या घरात पहिल्या आठवड्यात 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार, जाणून घेऊयात.
Published on
Summary

'बिग बॉस मराठी 6' च्या घरात भाऊचा धक्का चांगलाच रंगला आहे.

घरात पहिल्या आठवड्यात 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

रितेश देशमुखने सागर कारंडेचे भरभरून कौतुक केले.

'बिग बॉस मराठी 6' च्या घरात पहिला भाऊचा धक्का चांगलाच रंगला आहे. रितेश भाऊंनी आपल्या स्टाइलमध्ये घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली आहे, तर काहींचे भरभरून कौतुक केले आहे. बिग बॉसच्या घरात गायिका प्राजक्ता शुक्रे ही सहाव्या सीझनची पहिली कॅप्टन झाली. भाऊचा धक्का प्रेक्षकांना खूप आवडला. शनिवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सागर कारंडेचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या चांगल्या खेळाबद्दल रितेश बोलला. तर तन्वी आणि रुचिताची चांगलीच कानउघडणी केली. विशालला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा इशारा भाऊने दिला.

आता भाऊचा धक्क्याच्या दुसऱ्या भागात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नॉमिनेशच्या पतंग कापण्याच्या टास्कमध्ये एकूण नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्यांची यादी-

बिग बॉसची माहिती देणाऱ्या सोशल मिडिया साइट्स आणि प्रेक्षकांच्या मते या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार, जाणून घेऊयात. पहिल्या आठवड्यात दिव्या शिंदेला भरपूर मते मिळाली आहेत. रोशन, प्रभू शेळके यांची कामगिरीही चांगली आहे. राधा पाटील, करण सोनावणे आणि सागर करांडे यांना देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्यांचा गेम अजून उठून दिसत नाही. अनुश्री माने, रुचिता जामदार आणि दिपाली सय्यद या सदस्यांना नॉमिनेशच्या दृष्टीने धोका आहे. रुचिता आणि दिपाली यांना सर्वात कमी मते मिळाली असल्याचे दिसून येत आहे.

बिग बॉसच्या घरातून पहिल्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाले नाही. तसेच शेवटच्या क्षणी पहिल्या आठवड्यात 'एलिमिनेशन नाही' असा ट्विस्ट येण्याची देखील शक्यता आहे. बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन होणार की नाही? हे तुम्हाला आज (रविवार -18 जानेवारी) वीकेंड का वारमध्ये पाहायला मिळेल. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 6 Elimination Update
Mrunal And Dhanush: मृणाल ठाकूर आणि धनुष व्हॅलेंटाईन डेला अडकणार लग्नबंधनात? वाचा महत्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com