Bigg Boss Kannada 12 Winner : बिग बॉसचा विजेता ठरला; पहिले 2 Runner-Up कोण? पाहा PHOTOS

Bigg Boss Kannada 12 Winner Price : 'बिग बॉस कन्नड 12' चा ग्रँड फिनाले पार पडला आहे. विजेता कोण आणि त्याला बक्षिसात काय मिळाले जाणून घेऊयात.
Bigg Boss Kannada 12 Winner Price
Bigg Boss Kannada 12 Winnersaam tv
Published On
Summary

'बिग बॉस कन्नड 12'चा ग्रँड फिनाले पार पडला.

'बिग बॉस कन्नड 12'च्या विजेत्याला ट्रॉफी, लग्जरी कार आणि रोख रक्कम मिळली.

'बिग बॉस कन्नड 12' चे होस्टिंग प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीप करतो.

सध्या सर्वत्र बिग बॉसची चर्चा पाहायला मिळत आहे. लोक बिग बॉस हिंदीनंतर आता 'बिग बॉस मराठी ६' एन्जॉय करताना दिसत आहे. अशात 'बिग बॉस कन्नड 12' चा ग्रँड फिनाले पार पडला असून विजेत्याचे नाव समोर आले आहे. बिग बॉस कन्नड सीझन 12 चा ग्रँड फिनाले रविवारी संध्याकाळी कलर्स कन्नड आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित झाला. 'बिग बॉस कन्नड 12' चा विजेता प्रेक्षकांचा लाडका गिल्ली नाटा झाला आहे. त्याने बिग बॉसची भव्य ट्रॉफी उचलली आहे.

'बिग बॉस कन्नड 12' चे होस्टिंग प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीप करतो. गिल्ली नाटा हा 'बिग बॉस कन्नड 12' ची ट्रॉफी उचलताना भावुक झाला आणि भारावून गेला. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि कलाकार त्यांचे कौतुक करताना, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

विजेत्यांची यादी

  • गिल्ली नाटा - विजेता

  • रक्षिता शेट्टी - उपविजेता

  • अश्विनी गौडा - दुसरा उपविजेता

ग्रँड फिनालेला किच्चा सुदीप यांनी गिल्ली नाटाचा हात वर करून त्याला 'बिग बॉस कन्नड 12' चा विजेता घोषित केले. त्याने ट्रॉफीसोबत 50 लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि एक नवीन मारुती सुझुकी व्हिक्टोरिस कार जिंकली. प्रथम उपविजेती म्हणून रक्षिताला 25 लाख रुपये बक्षीस मिळाले. गिल्लीच्या विनोदी शैलीमुळे सीझनच्या सुरुवातीलाच तो लोकप्रिय झाला.

गिल्ली नाटा कोण?

गिल्ली नाटा हा प्रसिद्ध युट्यूब स्टार आहे. जिथे त्याला आपल्या कॉमेडी शैलीने खूप ओळख मिळाली. त्याने 'कॉमेडी खिलाडीगळू सीझन 4' मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. ज्याचा तो उपविजेता ठरला. त्याने 'डान्स कर्नाटक डान्स' आणि 'भरजरी बॅचलर्स' यांसारख्या शोमध्ये तसेच काही वेब शोमध्येही भाग घेतला आहे. त्याने दर्शनच्या 'द डेव्हिल' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.

Bigg Boss Kannada 12 Winner Price
The Bhabiji Ghar Par Hain movie : चित्रपटाच्या सेटवर भयंकर अपघात; 500 किलोचे झाड कोसळले, मुख्य कलाकारांचा जीव थोडक्यात बचावला, वाचा थरारक प्रसंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com