Bigg Boss Marathi 6 Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात राखीचा बोलबाला; नॉमिनेशन टास्कमध्ये झाला राडा, राकेशने स्वतःचा फोटो फाडला | VIDEO

Bigg Boss Marathi 6-Nomination Task : बिग बॉसच्या घरात राखी सावंत आल्यानंतर पहिला नॉमिनेश टास्क खेळला जाणार आहे. कोण कोणाला नॉमिनेट करतो जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

घरात पाचव्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क पार पडला आहे.

नॉमिनेशन टास्कमध्ये राकेश बापट स्वतःचा फोटो फाडतो.

'बिग बॉस मराठी 6' हा प्रेक्षकांचा आवडता शो आता अधिक मनोरंजक झाला आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतची घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. आज घरात नॉमिनेशन टास्क पार पडणार असून यामध्ये सदस्य एकमकांचे दात घश्यात घालणार आहे. असे त्या टास्कचे नाव आहे. नॉमिनेशन कार्यादरम्यान घरातील वातावरण प्रचंड तापताना दिसत आहे. आजच्या टास्कमध्ये फक्त नावे नाही तर सदस्यांची एकमेकांसाठीची खरी मते पाहायला मिळणार आहेत.

बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्वप्रथम तन्वी करणचा एक दात घशात घालते. त्यानंतर प्रभू आणि सचिनमध्ये शा‍ब्दिक चकमक पाहायला मिळते. सचिन प्रभूला म्हणतो, "तू गेला होतास का महाराष्ट्रात पाहायला..." या टास्कमुळे घरातील समीकरणे बदलताना दिसत आहे. टास्कमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राखी सावंत या कार्याची संचालक असल्याचे दिसत आहे.

बिग बॉसने व्हिडीओला कॅप्शन लिहिले की, "Nomination कार्यात कोणते सदस्य कोणाचे दात घालणार घशात?" या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. आता बिग बॉसच्या घरातून पाचव्या आठवड्यात कोण बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

बिग बॉसच्या घरात विशालला गेम पालटवायची सुवर्णसंधी मिळाली आहे. विशाल घरातील एखाद्या सदस्याची Power Key काढून घेऊ शकतो. विशालचा हा निर्णय कोणाला अडचणीत टाकणार? कोणाला फायदा होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. राखी सावंतमुळे घरात नवा ड्रामा होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG T20 WC Semi Final: टीम इंडियाचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; आता अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार

मोठी बातमी! भारतीय हवाई दलाचे Su-30 MKI लढाऊ विमान गायब, शोध सुरू

Friday Horoscope : ताणतणाव दूर होईल; ५ राशींच्या लोकांना संकटात आई-वडिलांची साथ मिळेल

Iran–US Conflict:भारतावर तेल संकट! देशात इंधनाचा तुटवडा? क्रूड ऑयलबाबत सरकारनं दिली महत्त्वाची अपडेट

दादांच्या आमदारांनाही घातपाताचा संशय? आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

SCROLL FOR NEXT