Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : "मस्तीत नाही शिस्तीत राहायचं..."; अनुश्रीवर संतापला रितेश भाऊ, कठोर शब्दात केली कानउघडणी-VIDEO

Riteish Deshmukh Bhaucha Dhakka : बिग बॉसच्या घरात आज भाऊचा धक्का रंगणार आहे. रितेश भाऊ अनुश्रीची चांगलीच शाळा घेणार आहे. नेमकं काय घडणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसमध्ये या आठवड्यात खूप भांडणे होतात.

अनुश्री प्राजक्तासोबत खूपच उद्धटपणे वागते.

भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ अनुश्रीवर संतापताना दिसणार आहेत.

बिग बॉसचे चाहते शनिवार-रविवारची आतुरतेने वाट पाहत असतात. या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर चांगलाच राडा होणार आहे. रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेणार आहे. नुकताच भाऊच्या धक्क्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात रितेश अनुश्रीला चांगलेच झापताना दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात गेल्या आठवड्यात बरेच भांडणे, राडा पाहायला मिळाले. तसेच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. काही सदस्यांनी नियम तोडले तर काहींची मैत्री तुटली. घरात सदस्य एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करताना सदस्य दिसले.

राकेश बापटने साकारलेल्या गणपतीच्या मूर्तीचे आणि प्राजक्ताच्या भजनाचे संपूर्ण महाराष्ट्राने कौतुक केले. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख चांगलाच संतापणार आहे. प्राजक्तावर दादागिरी करणाऱ्या अनुश्रीला रितेश भाऊ शब्दिक दणका देणार आहेत. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ आल्यावर सगळ्यांचीच बोलती बंद होते. रितेश भाऊ कोणाचे कौतुक करणार तर कोणाची शाळा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अनुश्री आणि प्राजक्ता यांच्यातील वादाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. प्राजक्ताशी बोलताना अनुश्रीचा आक्रमक आणि दादागिरीचा सूर पाहून घरातील वातावरण अधिकच तापलेले दिसले. प्रोमोमध्ये रितेश भाऊ अनुश्रीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करताना आणि तिला जाब विचारताना दिसणार आहे.रितेश देशमुख म्हणतो की, "अनुश्री तुम्ही मला सांगा...प्राजक्ता जेव्हा दिपालीला घेऊन आल्या तेव्हा तुम्ही काय म्हणालात? आईला घेऊन आलीस...जा आता बाबांना घेऊन ये...ये लक्ष येथे, भावाला आणलाय सांगा आता काय सांगणार... हे बिग बॉसचे घर आहे इथे मस्तीत नाही शिस्तीत राहायचे..."

आता अनुश्री खेळात काय बदल करते, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच या आठवड्यात कोण घराचा निरोप घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. तसेच घरातील समीकरणे बदलताना दिसणार आहेत. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील MIDC मध्ये अग्नितांडव, केमीकल कंपनीत भयंकर आग

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात शॉकिंग एलिमिनेशन; 'या' सदस्यांचा पत्ता कट, चाहते नाराज

Pune Crime : पत्नीने सोन्याचे दागिने मागितले, पतीने भर रस्त्यात केली निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Jio Recharge 90 Days: Jioचा 90 दिवसांचा स्वस्तात मस्त प्लान; डेटा, कॉलिंगसह 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Maharashtra Live News Update: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT