Border 2 Opening Collection : 'बॉर्डर 2'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

Border 2 Box Office Collection Day 1 : 'बॉर्डर 2' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. सनी देओलच्या चित्रपटाने रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाला मागे टाकले आहे. कलेक्शन वाचा.
Border 2 Box Office Collection Day 1
Border 2 Opening Collectionsaam tv
Published On
Summary

'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला रिलीज झाला आहे.

'बॉर्डर 2' ॲक्शन, युद्ध, देशभक्तिपर चित्रपट आहे.

'बॉर्डर 2' ने रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाला मागे टाकले.

पहिल्याच दिवशी 'बॉर्डर 2'ने घवघवीत यश कमावले आहे. रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाचा 'बॉर्डर 2'ने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सनी देओल 'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशा बक्कळ कमाई केली.'बॉर्डर 2' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंह हे आहेत. 'बॉर्डर 2' हा 1997 ला रिलीज झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटाचे ओपनिंग डेचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'बॉर्डर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'बॉर्डर 2' चित्रपटाने Sacnilk च्या रिपोर्टनुसार, पहिल्याच दिवशी तब्बल 30.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येही बक्कळ कमाई केली. आता वीकेंडला चित्रपट किती कोटींचा व्यवसाय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बॉर्डर 2' चे ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन 17.5 कोटी रुपयांवर गेले. चित्रपट वीकेंडला 100 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचे बोले जात आहे.

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

सनी देओलच्या 'बॉर्डर 2' चित्रपटाने पहिल्याच दिवशी रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाला मागे टाकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' सिनेमाने पहिल्या दिवशी 28 कोटी रुपयांची कमाई केली होती. दोन कोटींनी 'बॉर्डर 2'ने बाजी मारली आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटातील 'घर कब आओगे' गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'बॉर्डर 2' पाहण्यासाठी थिएटर हाफुसफुल दिसत आहेत.

'बॉर्डर 2' हा ॲक्शन, युद्ध, देशभक्तिपर सिनेमा आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, परमवीर सिंह चीमा, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मेधा राणा आणि मोना सिंग झळकले आहेत. 'बॉर्डर 2' चित्रपटाची कथा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

Border 2 Box Office Collection Day 1
Smriti-Palash Wedding : स्मृतीसोबतच्या लग्नाआधी पलाश मुच्छल दुसऱ्या मुलीसोबत बेडवर, टीम इंडियाच्या पोरींनी चोपला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com