Vinayak Chaturthi: आजपासून राज्यभरात माघी गणेश उत्सव; जाणून घ्या गणपती पूजेचा शुभ मुहूर्त

Vinayak Chaturthi January 2026 Date: महाराष्ट्रात आजपासून माघी गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे. भक्तगण मोठ्या उत्साहाने गणेशाची पूजा करत आहेत. हा उत्सव माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो.
Vinayak Chaturthi
Vinayak Chaturthisaam tv
Published On

यंदाच्या वर्षी २२ जानेवारी रोजी म्हणजे आज माघी गणेश साजरी केली जाणार आहे. शिवाय आजच्या दिवशी विनायक चतुर्थी व्रत पाळलं जाणार आहे. या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत पाळले जाते.

माघ महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीचं विशेष महत्त्व आहे. माघ शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला तिल चतुर्थी, कुंड चतुर्थी, गौरी गणेश चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असंही म्हणतात. या दिवशी भगवान गणेशाच्या पूजेमध्ये तीळ आणि कुंड फुलांचं खूप महत्त्व आहे.

Vinayak Chaturthi
Lucky zodiac signs: शुक्ल पंचमीनिमित्त आजचा शुभ दिवस; कोणत्या राशींना आर्थिक फायदा?

माघ महिन्याच्या शुद्ध पंधरवड्याच्या चतुर्थीला विनायक गणेश चतुर्थी तसंच उमा चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी महिला कुंद आणि इतर फुलं, गूळ आणि मीठ घालून देवी गौरीची पूजा करतात. ब्राह्मण आणि गायींनाही यावेळी विशेष आदर देण्यात येतो. धार्मिक श्रद्धा आहे की, असं केल्याने सर्व प्रकारचं सुख आणि समृद्धी मिळते. विनायक चतुर्थीला भगवान गणेशासह देवी गौरीची पूजा करण्याची प्रथा आहे.

विनायक चतुर्थी 2026 चा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, माघ शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी २२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २:४७ वाजता सुरू झाली. ती २३ जानेवारी रोजी पहाटे २:२९८ वाजता संपणार आहे. चतुर्थीचा मध्यान्ह मुहूर्त सकाळी ११:४३ ते दुपारी १:५७ पर्यंत असणार आहे. या दिवशी मध्यान्हाच्या वेळी गणपतीची पूजा करणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. चंद्रोदयाचा निषिद्ध वेळ संध्याकाळी ५:२६ ते रात्री ८:४७ पर्यंत असणार आहे.

Vinayak Chaturthi
How To Know UAN: UAN नंबर विसरालात? आधार आणि फोन नंबर मिळवून देईल UAN, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

भगवान गणेश हे प्रथम पूजनीय देवता मानण्यात येतात. अशावेळी कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीची पूजा केली जाते. भगवान गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे नष्ट होतात. चतुर्थीचे व्रत सर्व इच्छा पूर्ण करतात, असं मानलं जातं. भक्तीने हे व्रत केल्याने गणेशाच्या भक्तीसह आयुष्यात सुखही येणार आहे.

Vinayak Chaturthi
Auspicious Day Zodiac Signs: चंद्रदेवाच्या आशिर्वादाने आजचा दिवस ठरणार खास; या राशींना मिळणार शुभ परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com