How To Know UAN: UAN नंबर विसरालात? आधार आणि फोन नंबर मिळवून देईल UAN, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

UAN (Universal Account Number) : UAN जाणून घेण्यासाठी तुम्ही EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
How To Know UAN
Recover your UAN easily with Aadhaar and mobile number – step-by-step EPFO process.saamtv
Published On
Summary
  • UAN म्हणजे PF सदस्याचा वेगळा ओळख क्रमांक असतो.

  • हरवलेला UAN आधार व मोबाईलवरून मिळवता येतो.

  • EPFO च्या वेबसाइटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येते.

पगारातून भविष्य निर्वाह निधी किंवा पीएफ कापला जातो. गरज पडल्यास पीएफमधून काही रक्कम काढू शकता. तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे आहेत हे देखील तुम्ही तपासू शकता. पीएफच्या खात्यातून पैसे काढणं असावं किंवा पैसे चेक करणं असावं त्यासाठी युएएन नंबर आवश्यक असते. पण जर तुमच्याकडून तुमचा युएएन नंबर हरवला तर काय कराल. तुमची ही समस्या आम्ही सोडवू.

UAN म्हणजे काय?

UAN किंवा युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे जारी केला जातो. हा १२ अंकी क्रमांक असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला एक UAN दिले जाते आणि प्रत्येकाचा एक वेगळा UAN असतो. जर एखाद्या कर्मचाऱ्याने जर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले असेल तर त्याचे नवीन PF खाते तयार केले जाऊ शकते, परंतु UAN तेच राहत असते.

तुमचा UAN माहित नसेल तर तुम्ही EPFO ​​वेबसाइटला भेट देऊन माहिती करून घेऊ शकतात. यासाठी आधार क्रमांक, पॅन क्रमांक किंवा सदस्य आयडी माहित असणे आवश्यक आहे. पीएफ खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक माहित असणे आवश्यक असतो.

How To Know UAN
EPFO News : नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला मिळणार ५०,००० रुपये ; जाणून घ्या सविस्तर

UAN जाणून घेण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला असलेल्या सेवांच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

"कर्मचाऱ्यांसाठी For Employees" या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला पेजवर दिलेला सेवा Services विभाग दिसेल. त्यानंतर सदस्य UAN/ऑनलाइन सेवांवर क्लिक करा.

How To Know UAN
EPFO चा मोठा निर्णय; पीएफ खात्यात एकही पैसा नसला तरी EDLI मधून मिळतील ५०,०००रुपये

तुम्ही एका नवीन पेजवर जाल. यावर तुम्हाला उजव्या बाजूला लॉगिन विंडोच्या खाली "महत्त्वाच्या लिंक्स" हा विभाग दिसेल.

यामध्ये अनेक पर्याय असतील. तुम्हाला Know Your UAN वर क्लिक करावे लागेल.

हे करताच एक नवीन विंडो उघडेल. त्यात तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका त्यानंतर Request OTP वर क्लिक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com