Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस राखी सावंतवर भडकले; थेट हाताला धरून बाहेर काढलं, ड्रामा क्वीन रडतच राहिली|VIDEO

Bigg Boss Marathi 6 - Rakhi Sawant Evicted : बिग बॉस राखी सावंतवर प्रचंड भडकतात आणि तिला थेट बाहेरचा रस्ता दाखवतात. बिग बॉसच्या घरात नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉस ड्रामा क्वीन राखी सावंतवर प्रचंड संतापतात.

बिग बॉस राखी सावंतला हाताला धरून बाहेर काढतात.

नुकतेच बिग बॉसच्या घराचा आयुष आणि करण यांनी निरोप घेतला आहे.

'बिग बॉस मराठी 6'चा खेळ दिवसेंदिवस अधिक मजेशीर होत आहे. या भाऊच्या धक्क्यावर घरातील दोन सदस्य बाहेर गेले. आयुष्य संजीवसोबत करण सोनावणे देखील घराबाहेर पडतो. ज्यामुळे घरातील काही सदस्यांना मोठा धक्का बसतो. करणच्या घराबाहेर जाण्याने प्राजक्ता खूप रडते. अशात आता बिग बॉसचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का मिळणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच राखी सावंतला बिग बॉसने घराबाहेर काढले आहे. नेमकं घरात घडलं काय, जाणून घेऊयात.

बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बिग बॉस जेव्हा राखीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात. तेव्हा राखीसोबत घरातील इतर सदस्यांना देखील मोठा धक्का बसतो. राखी घराबाहेर जाताना खूप रडते. बिग बॉसला विनंती करते की, मला घरी राहू दे. मात्र बिग बॉस राखीला हाताला धरून बाहेर काढतात. बिग बॉस राखीला confession रूमध्ये बोलवतात. व्हिडीओमध्ये राखी सावंत घरात कचरा करताना, इतर सदस्यांशी भांडताना दिसत आहे. त्यांच्यात नेमका संवाद काय घडतो पाहुया.

  • बिग बॉस -राखी नाराज आहे...

  • राखी सावंत - खरंच मनापासून सॉरी...

  • बिग बॉस - आता बिग बॉस वाट लावणार...राखी confession रुममध्ये या...

  • बिग बॉस - या घराची जी अवस्था आहे, त्यामुळे आता आपल्यावर ऍक्शन घेण्याचे ठरवले आहे...

  • राखी सावंत - बिग बॉस मी काय केलंय?

  • बिग बॉस - टीम राखीला आता बाहेर काढा...

  • राखी सावंत - मला राहायचे आहे...

व्हिडीओला कॅप्शन दिलं की, "राखीचे वागणे बघून, बिग बॉसने घेतला कठोर निर्णय! " या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहे. काही लोकांना राखीला घराबाहेर काढल्यामुळे आनंद झाला आहे. तर काहींना आता घरात ड्रामा पाहायला मिळणार नाही म्हणून दुःख होत आहे. आता खरंच बिग बॉसने राखीला घराबाहेर काढले की तिला अजून कोणती शिक्षा देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT