

गाझियाबादमध्ये ३ अल्पवयीन मुलींची आत्महत्या
तिघी मुली सख्ख्या बहिणी होत्या
ऑनलाइन गेमच्या नादात या तिघींनी आयुष्य संपवलं
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. याठिकाणी ३ सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या तिन्ही मुली अल्पवयीन होत्या.गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीमध्ये मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या तिघींना देखील ऑनलाइन गेम खेळण्याची सवयी होती. याच गेममुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशिका (१६ वर्षे), प्राची (१४ वर्षे) आणि पाखी (१२ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या मुलींची नावं आहेत. या तिन्ही बहिणींना ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन होते. त्यांच्या कुटुंबियांनी गेम खेळण्यासाठी विरोध केल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. गाझियाबादमधील टीला मोड पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या भारत सिटीमध्ये ही घटना घडली. पोलिस सध्या या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भारत सिटी बी १ टॉवरच्या ९०७ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये या बहिणी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होत्या. त्यांना ऑनलाइन मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन होते . जेवणे, शाळेत जाणे, झोपणे आणि इतर दैनंदिन कामे यासारख्या सर्व गोष्टी त्या एकत्र करायच्या. मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास तिघांनीही ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या तिन्ही बहिणी ऑनलाइन टास्क बेस्ड कोरियन लव्ह गेम खेळायच्या. तिघींनी एकाच दिवशी आयुष्य संपवल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर त्यांचे वडील चेतन कुमार अजूनही धक्क्यात आहेत. कोविड-१९ साथीच्या काळात तिन्ही बहिणींना मोबाईल गेमचे व्यसन लागले होते. तिन्हीही टार्गेट गेम खेळायच्या. या गेमच्या नादापायी त्या शाळेत नियमित जात नव्हत्या अशी देखील माहिती समोर आली. तिघी सर्व काम एकत्रच करायच्या आणि आता त्यांनी एकत्र आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.