Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी ६' चा विजेता ठरला? टॉप ५ मध्ये कोण? अभिनेत्याची 'ती' पोस्ट व्हायरल

Bigg Boss Marathi 6 Winner : 'बिग बॉस मराठी 6' सुरू झाल्यापासून चांगलेच गाजत आहे. रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. यंदा कोण विजेते पदाची ट्रॉफी उचलणार, जाणून घेऊयात.
Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 saam tv
Published On
Summary

'बिग बॉस मराठी 6' मध्ये गेल्या आठवड्यात राखी सावंतची एन्ट्री झाली.

भाऊच्या धक्क्यावर विशाल, रुचिताची रितेशने चांगली शाळा घेतली.

सोशल मीडियावर बिग बॉसच्या विजेत्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस मराठी 6' दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. शो सुरू होऊन आता एक महिना झाला आहे. यंदा सीझनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक पाहायला मिळत आहेत. जी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. या शोला अवघ्या महाराष्ट्रातील प्रेम मिळत आहे. काल भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने विशाल कोटियन आणि रुचिता जामदारची चांगली शाळा घेतली आहे. तर गेल्या आठवड्यात ड्रामा क्वीन राखी सावंतने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे घरातील भांडणांचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस मराठी 6' सुरू झाल्यापासून यंदाच्या सीझनचा विजेता कोण असणार याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चाहते आपापल्या स्पर्धकाला विजेता करण्यासाठी मत देत आहेत. तर इतर प्रेक्षक वर्ग अंदाज वर्तवताना दिसत आहे. तसेच कायम बिग बॉसचे आधीच्या सीझनचे स्पर्धकही टप्याटप्याने आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशात 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाचा उपविजेता आणि लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी खूपच व्हायरल होत आहे.

पुष्कर जोगने त्याच्या मते 'बिग बॉस मराठी 6'चे टॉप 5 स्पर्धक कोण असणार याची खुलासा केला आहे. तसेच त्याच्यासाठी विजेता कोण हे देखील सांगितले आहे. पुष्कर जोगने इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर टॉप 5ची यादी शेअर केली आहे.

टॉप 5 सदस्य कोण?

  1. तन्वी कोलते

  2. राकेश बापट

  3. रोशन भजनकर

  4. सागर कारंडे

  5. दिपाली सय्यद

तन्वी आणि राकेश टॉप 2 असू शकतात...

तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी 6'ची विजेता असेल...

pushkar jog
pushkar jogsaam tv

आता पुष्कर जोगचा हा अंदाज किती खरा ठरणार, हे येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर कोण घराबाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 : एक नाही तर दोन सदस्य जाणार बाहेर? घरातील नात्यांचं गणित पुन्हा बदलणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com