भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख रुचिताची शाळा घेतो.
'बिग बॉस मराठी 6' मधून दोन सदस्य बाहेर जाणार आहेत.
घरातील 6 सदस्य बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
'बिग बॉस मराठी 6' मध्ये रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. राखी सावंत घरी आल्यापासून शोमधील ड्रामा आणखी वाढला आहे. राखी कधी रुचिता, कधी करण तर कधी सागर सर्वांशी भांडताना दिसत आहे. अशात आता बिग बॉसच्या घरात आज-उद्या भाऊचा धक्का रंगणार आहे. या आठवड्यात बाहेर जाण्यालाठी 6 सदस्य नॉनिमेट झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस मराठी 6' मध्ये डबल एव्हिक्शन पार पडणार असल्याचे बोले जात आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता पर्यंत बिग बॉसच्या घरातून राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे आणि ओमकार राऊतची एक्झिट झाली आहे. घरातील सदस्यांना धमकी दिल्यामुळे दिव्या शिंदेला बिग बॉसने घराबाहेर काढले.
करण सोनावणे
प्रभू
प्राजक्ता शुक्रे
सचिन कुमावत
आयुष संजीव
मीडिया रिपोर्टनुसार, या आठवड्यात आयुष संजीव घराबाहेर जाणार असल्याचे बोले जात आहे. कारण राखी सावंत घरी आल्यापासून आयुष संजीव कुठेच दिसला नाही. तो खेळात सहभागी नव्हता. ना कोणत्या भांडणांमध्ये आयुष्य पाहायला मिळाला. त्यामुळे आयुष संजीव या आठवड्यात बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार असल्याचे बोले जात आहे. तर डबल एव्हिक्शनमध्ये दुसरे नाव करण सोनावणेचे आहे. एकीकडे प्रेक्षकांची मते कमी मिळाल्यामुळे करण सोनावणे घराबाहेर जाईल असे बोले जात आहे. तर दुसरीकडे करणला सीक्रेट रुममध्ये ठेवले जाणार असल्याचे बोले जात आहे.
बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओत भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ पुन्हा रुचिताची शाळा घेताना दिसत आहे. रितेश खूपच रुचितावर भडकला आहे. आता भाऊच्या धक्क्यावर काय होते? राखी सावंत बद्दल भाऊ काय बोलतात? तर बिग बॉसच्या घरातून कोणाची एक्झिट होते. हे सर्वच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.