Bigg Boss Marathi 6  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताच राधा पाटीलचं मोठं विधान, 'लावणी'वरून हिणवणाऱ्यांना रडत रडत दिलं उत्तर|VIDEO

BB Marathi 6- Radha Patil Eliminated : बिग बॉसच्या घरातून राधा पाटीलची एक्झिट झाली आहे. घराबाहेर पडताना राधा पाटीलने 'लावणी' वर मोठे वक्तव्य केले आहे.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरातून राधा पाटील बाहेर गेली.

घरातून बाहेर पडताना राधा पाटील ढसाढसा रडली.

राधा मुंबईकरने लावणी संबंधित मोठे वक्तव्य केले आहे.

'बिग बॉस मराठी 6' खेळ दिवसेंदिवस अधिक रंजक होत जात आहे. अखेर बिग बॉसच्या घरातून पहिला स्पर्धक बाहेर पडला आहे. काल म्हणजे रविवारी दुसरा भाऊचा धक्का बिग बॉसच्या घरात पार पडला. यावेळी घरातील एका सदस्यांने घराचा निरोप घेतला. हा सदस्य दुसरा-तिसरा कोणी नसून नृत्यांगना राधा पाटील आहे. बिग बॉसच्या घरातून राधा पाटील पहिली स्पर्धक बाहेर पडली आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना राधा पाटील खूपच भावुक झाली. ती रडू लागली. पण राधाने जाताजाता 'लावणी' संबंधित मोठे वक्तव्य केले आहे. रितेश भाऊंनी नॉमिनेशनची घोषणा करताच राधा पाटीलला अश्रू अनावर झाले.

रितेश देशमुखने तिला तिच्या भावना विचारल्या. त्यावेळी राधा पाटील लावणी विषयी म्हणाली की, "मला महाराष्ट्रासमोर सिद्ध करायचे आहे की, आमचा शो घाणेरडा नाही. आम्ही लावणी व्यवस्थित करू शकतो आणि यापुढे व्यवस्थित करू..." त्यानंतर बिग बॉसच्या खेळाविषया राधा म्हणाली की, " ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. पण मला खेळता आले नाही. पण मी पुढे जाईन. वेगवेगळ्या माणसांसोबत मी राहू शकेन, इतकी मी मॅच्युअर झालेली नाही. पहिल्यांदा मी असे कोणत्या ती शोमध्ये गेले होते."

गेल्या दोन आठवड्यात बिग बॉसच्या घरातील 9 सदस्य नॉमिनेट झाले होते. यात प्रभू शेळके, अनुश्री माने, दिव्या शिंदे, सागर कारंडे, राधा पाटील, रोशन भजनकर, करण सोनावणे, दीपाली सय्यद, रुचिता जामदार यांचा समावेश होता. आता बिग बॉसच्या घरात तिसरा आठवडा सुरू झाला आहे. पुन्हा एकदा नॉमिनेशनची टांगती तलवार सदस्यांच्या डोक्यावर पाहायला मिळणार आहे. आता तिसऱ्या आठवड्यात घरात कोणता राडा होतो आणि कोण एलिमिनेट होते, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राधा पाटीलच्या बाहेर जाण्यामुळे घरातील काही सदस्य खूपच दुःखी पाहायला मिळाले. 'टोळी'तील एक सदस्य घराबाहेर गेला आहे. या टोळीत रुचिता, राधा, अनुश्री, विशाल, रोशन होते. राधा पाटील ही लावणीसम्राज्ञी आहे. महाराष्ट्रभर तिच्या लावणीचे कार्यक्रम गाजतात. बिग बॉसच्या घरात राधा पाटीलने आपण लिव्ह इन रिलेशनशिप राहत असल्याचा खुलासा केला. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajasthan: राजस्थानमधून १० हजार किलो स्फोटकं जप्त, प्रजासत्ताक दिनादरम्यान काय प्लान होता? तपास सुरू

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे २४,५०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Ind Vs Nz: बॅट लोखंडाची नाहीये ना? तुफान खेळीनंतर किवींनी तपासणी अभिषेक शर्माची बॅट

Maharashtra Live News Update: कर्तव्यपथावर शौर्यदर्शन! ३० चित्ररथांचं संचालन सुरु

O Romeo : शाहिद कपूर झाला मालामाल; 'ओ रोमियो'साठी घेतलं तगडे मानधन, नाना पाटेकरांची फी किती?

SCROLL FOR NEXT