Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी ६'मध्ये मोठा बदल, रितेश भाऊ कधी अन् कोणत्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार? पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6-Riteish Deshmukh : 'बिग बॉस मराठी ६' पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रितेश भाऊ कधीपासून चाहत्यांच्या भेटीला येणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बिग बॉस मराठी ६'चे होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे.

कलर्स मराठीवरील मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

खूप दिवसांपासून सर्वत्र 'बिग बॉस मराठी ६' ची चर्चा पाहायला मिळत आहे. प्रेक्षक शो पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. या धमाकेदार शोचे होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे. 'बिग बॉस मराठी ६'मध्ये कोण कोण झळकणार याची चर्चा चांगली रंगली आहे. अशात आता 'कलर्स मराठी'ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात 'कलर्स मराठी'च्या मालिकांचे बदललेले वेळापत्रक पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस मराठी ६'च्या रिलीज डेट आणि तारखेविषयी मोठे अपडेट समोर आले आहेत.'कलर्स मराठी'ने शेअर केलेल्या नवीन प्रोमोनुसार 'बिग बॉस मराठी 6' शो 12 जानेवारीपासून संध्याकाळी 8.00 वाजता पाहायला मिळणार आहे. हा शो कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी ६' शो 8.00 वाजता प्रसारित होणार असेल तर 8.30 वाजता प्रसारित होणाऱ्या 'अशोक मामा' मालिकेच काय होणार? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसेच 'अशोक मामा' मालिका संपणार की नवीन वेळेत पाहायला मिळणार याबद्दल अद्याप कोणताही खुलासा झाला नाही.

  • इंद्रायणी - संध्या. 6.30 वाजता

  • आई तुळजाभवानी - संध्या.7.00 वाजता

  • जय जय स्वामी समर्थ - संध्या. 7.30 वाजता

  • बिग बॉस मराठी ६- संध्या. 8.00 वाजता

  • पिंगा गं पोरी पिंगा - रात्री 11.00 वाजता

'बिग बॉस मराठी 5' विजेता

रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी 5' चे होस्टिंग केले होते. या सीझनचा विजेता सूरज चव्हाण झाला. अलिकडेच सूरज चव्हाणने लग्नगाठ बांधली. त्याचा 'झापुक झुपूक' नावाचा चित्रपट देखील आहे. तसेच 2025 मध्ये त्याने आपल्या हक्काच्या घरात प्रवेश देखील केला. 'बिग बॉस मराठी 5' मुळे सूरज चव्हाणला खूप लोकप्रियता मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, मनसे नेते संतोष धुरींचा भाजपमध्ये प्रवेश; पक्ष सोडण्यामागचं कारणही सांगितलं

Maharashtra Live News Update : माजलगाव येथील शिफा बिलाल चाऊस यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाकडून खासदार उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी|VIDEO

Uddhav- Raj Thackeray: ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत, ८ जानेवारीला होणार प्रदर्शित; पहिला PHOTO समोर

Varanasi Release Date: १३०० कोटींचा 'वाराणसी' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित!

SCROLL FOR NEXT