Marathi Serial: तेजश्री प्रधान आणि रेश्मा शिंदेच्या मालिकेत रंगली स्पर्धा; कोणती मालिका ठरली प्रेक्षकांची फेव्हरेट? पाहा TRP यादी

Marathi Serial: मराठी टीव्ही TRP यादीत ‘ठरलं तर मग’ पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर झी मराठीवरील ‘कमळी’ने नंबर 1 स्थान मिळवत प्रेक्षकांची मनं जिंकली. जाणून घ्या सविस्तर TRP रेटिंग्स.
Marathi Serial
Marathi Serial
Published On

Marathi Serial: मराठी टीव्ही मालिकांचा नवीन टीआरपी अहवाल जाहीर झाला असून यात गेल्या आठवड्याच्या आकडेवारीनुसार ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी मारली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेला ५.३ रेटिंग मिळाल्यामुळे त्या यादीतील पहिल्या क्रमांकावर कायम राहण्यात यश मिळाले आहे. तर आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेतील ‘नशीबवान’ मालिका ४.८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.

गेल्या आठवड्यात ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेने अखेरचा भाग प्रदर्शित केला आणि ४.७ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर गाठला आहे. तर ‘तू ही रे माझा मितवा’ ही कथा ४.४ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे.

Marathi Serial
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आधी ४२०ची केस आता घर आणि रेस्टॉरंटवर इनकम टॅक्सचा छापा, पण...

टीआरपीच्या टॉप-५ यादीत यावेळी झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ मालिकेने ४.१ रेटिंगसह स्थान मिळवलं आहे. ही मालिकेला पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये आल्यामुळे विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. ‘कमळी’ मालिकेने झी मराठीवर सर्वाधिक रेटिंग मिळवणारी मालिका म्हणून नंबर १ स्थान मिळवलं आहे.

Marathi Serial
Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

इतर मालिकांमध्ये ‘घरोघरी मातीच्या चुली’ (३.८) सहावी आणि ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (३.७) सातवी क्रमांकावर आहेत. या दोन्ही मालिकेत मोठी चुरस पहायला मिळत आहे. याशिवाय ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘तारिणी’, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका सुमारे ३.५ रेटिंगने आठव्या क्रमांकावर आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ आणि ‘देवमाणूस’ यांनी अनुक्रमे ९वे आणि १०वे स्थान मिळवलं आहे.

टीआरपीच्या या यादीत ‘ठरलं तर मग’ मालिकेने तीन वर्षांपासून सतत चांगली कामगिरी करून दर्शकांचा विश्वास जपला आहे. तसेच ‘कमळी’ सारख्या तुलनेने नव्या मालिकेचा टॉप-५ मध्ये स्थान मिळवणं म्हणजे वाहिनीच्या टीआरपी स्पर्धेत वाढती स्पर्धा दाखवते. पुढील काही आठवड्यांत नवीन मालिकांच्या आगमनामुळे टीआरपी मध्ये आणखी बदल दिसू शकतात. त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीचा खेळ अधिक रोचक बनेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com