Bigg Boss Marathi 6 : अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं 'बिग बॉस मराठी'शी खास नातं, कोकण हार्टेड गर्लनं VIDEO शेअर करत केला खुलासा

Ankita Walawalkar - Kunal Bhagat : अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना एक खास माहिती दिली आहे. अंकिताच्या नवऱ्याचे 'बिग बॉस मराठी 6'शी नातं आहे.
Ankita Walawalkar - Kunal Bhagat
Bigg Boss Marathi 6SAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस मराठी 6' नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बिग बॉस मराठी 6' चे होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे.

'बिग बॉस मराठी'सोबत अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचे खास नातं आहे.

अलिकडेच सलमान खानचा 'बिग बॉस 19' शो संपला. या सीझनचा विजेता गौरव खन्ना ठरला. आता बिग बॉस हिंदीनंतर बिग बॉस मराठीचा नवा सीझन पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी 6' नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या धमाकेदार शो चे होस्टिंग महाराष्ट्राचे लाडके रितेश भाऊ म्हणजे रितेश देशमुख करणार आहे. ज्यामुले चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अशात नुकताच 'बिग बॉस मराठी 6' चा हटके प्रोमो रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली. व्हिडीओमध्ये मराठमोळा साज पाहायला मिळाला. तसेच प्रोमोची म्युझिक प्रेक्षकांना खूपच जास्त आवडली. 'बिग बॉस मराठी 6' संबंधित एक खास अपडेट समोर आली आहे. 'बिग बॉस मराठी 5' स्पर्धक अंकिता वालावलकरने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने आपल्या नवऱ्याचे म्हणजे कुणाल भगतचे 'बिग बॉस मराठी' सोबत असलेले खास नातं सांगितले आहे.

अंकिता वालावलकर नवरा कुणाल भगत हा एक उत्तम संगीतकार आहे. 'बिग बॉस मराठी 6'च्या प्रोमोला कुणालने म्युजिक दिलं आहे. हा व्हिडीओ 'Mudeye Studios' स्टुडिओमध्ये एडिट केला गेला आहे. अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कुणाल बिग बॉस मराठीच्या व्हिडीओवर काम करताना दिसत आहे. तसेच कुणालने 'बिग बॉस मराठी 5' प्रोमोलाही म्युजिक दिले होते.

'बिग बॉस मराठी 6' कधी सुरू होणार?

रितेश भाऊंचा 'बिग बॉस मराठी 6' हा शो 11 जानेवारी 2026 पासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक कार्यक्रमासाठी खूपच उत्सुक आहेत. तसेच यंदा सीझनमध्ये कोण कोणते कलाकार झळकणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र सोशल मीडियावर अनेक कलाकारांच्या नावांची चर्चा पाहायला मिळत आहे.

Ankita Walawalkar - Kunal Bhagat
Emraan Hashmi : सई ताम्हणकरनंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हाश्मीसोबत झळकणार, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com