Emraan Hashmi : सई ताम्हणकरनंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हाश्मीसोबत झळकणार, पाहा VIDEO

Emraan Hashmi New Project : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीची नवीन वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये इमरान हाश्मी मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत झळकणार आहे.
Emraan Hashmi New Project
Emraan Hashmisaam tv
Published On
Summary

इमरान हाश्मीच्या नवीन वेब सीरिज झलक नुकतीच पाहायला मिळाली आहे.

इमरान हाश्मी मराठी अभिनेत्रीसोबत चित्रपटात झळकणार आहे.

इमरान हाश्मीने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

बॉलिवूडचा हिरो इमरान हाश्मी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्यांच्या अभिनयाचे जगभरात चाहते आहेत. इमरान हाश्मी (Emraan Hashmi) लवकरच एका नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची एक झलक नुकतीच पाहायला मिळाली आहे. इमरान हाश्मीच्या आगामी वेब सीरिजचे नाव 'तस्करी: द स्मगलर्स वेब' (Taskaree: The Smugglers Web ) असे आहे. या वेब सीरिजमध्ये तो एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत झळकणार आहे.

इमरान हाश्मीसोबत यापूर्वी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने 'ग्राउंड झिरो' चित्रपटात काम केले होते. आता इमरान हाश्मीसोबत काम करणारी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची चंद्रा आहे. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar ) आणि बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी एकत्र झळकणार आहेत. 2025 च्या शेवटी अमृता खानविलकरने चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहेत. त्यामुळे प्रेक्षक खूपच खुश आहेत.

Taskaree वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यात बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळणार आहे. सीरिजमध्ये झोया अफरोज, फ्रेड्डी दारुवाला, अनुजा साठे, नंदिश सिंग संधू आणि शरद केळकर हे कलाकार झळकणार आहेत. सीरिजचा टीजर 17 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "पकड़े गए... तस्करी की दुनिया में आप का स्वागत है..."

Taskaree वेब सीरिजचे दिग्दर्शक नीरज पांडे आहेत. चाहते या वेब सीरिजसाठी खूपच उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी अमृता खानविलकरने चाहत्यांना नव्या वर्षात रंगभूमीवर पदार्पण करणार असल्याचे सांगून एक छान गिफ्ट दिले होते. ती पहिल्यांदाच नाटकात काम करणार आहे. तिच्या या नाटकाचे नाव 'लग्न पंचमी' असून ती अभिनेता स्वप्नील जोशीसोबत झळकणार आहे.

Emraan Hashmi New Project
Rajinikanth : रजनीकांतच्या चित्रपटात बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री झळकणार, 'जेलर 2'ची मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com