Rajinikanth : रजनीकांतच्या चित्रपटात बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री झळकणार, 'जेलर 2'ची मोठी अपडेट

Rajinikanth-Jailer 2 : रजनीकांत यांच्या 'जेलर 2' या बहुप्रतिक्षित चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली. वाचा अपेडट
Rajinikanth-Jailer 2
Rajinikanthsaam tv
Published On
Summary

रजनीकांत लवकरच 'जेलर 2' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'जेलर 2' चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

'जेलर 2' चित्रपट 2026 ला रिलीज होणार आहे.

साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. ते खूप वेळेपासून 'जेलर 2' चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहे. 'जेलर 2' बद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे. 'जेलर 2'मध्ये आता बॉलिवूडच्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 'जेलर 2'हा नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित चित्रपट आहे. 'जेलर 2' पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, 'जेलर 2' चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची एन्ट्री झाली आहे. विद्या बालनने हा चित्रपट नुकताच साइन केला आहे. चित्रपटात अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे बोले जात आहे. अद्याप 'जेलर 2' मधील विद्या बालनच्या भूमिकेचे नाव समोर आले नाही. चाहते विद्याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर आहेत.

'जेलर 2' रिलीज डेट काय?

रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित 'जेलर 2' सिनेमा 14 ऑगस्ट 2026 ला रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मार्च 2025मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरण चेन्नई येथे सुरू झाले होते. चित्रपटाचे शूटिंग लवकरच संपणार आहे. तसेच 'जेलर 2'मध्ये साऊथ अभिनेते मोहनलाल आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती देखील दिसणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

'जेलर 2'चा पहिला भाग 'जेलर' 2023 ला रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने बंपर कमाई केली. मीडिया रिपोर्टनुसार, 'जेलर 'ने जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली.

Rajinikanth-Jailer 2
Mumbai : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, काठीने मारहाण, हायप्रोफाईल सोसायटीत नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com