Breaking News

Emraan Hashmi: इमरान हाश्मीची 'OG' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अचानक प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Emraan Hashmi Hospitalised: बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. त्याचा आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची तब्येत बिघडली.
Emraan Hashmi Hospitalised
Emraan Hashmi HospitalisedSaam Tv
Published On: 

Emraan Hashmi: बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीला डेंग्यू झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. त्याचा आगामी 'OG' या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीतील सेटवर त्याची तब्येत बिघडली. ब्लड टेस्टनंतर डेंग्यू असल्याचे समजताच त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.

'OG' हा चित्रपट इमरान हाश्मीचा तेलुगू चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्यामध्ये तो खलनायकाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात पवन कल्याण मुख्य भूमिकेत असून, प्रियंका मोहनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले असून, संगीत थमन एस. यांनी दिले आहे. हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Emraan Hashmi Hospitalised
Tara Sutaria: तारा सुतारिया पुन्हा प्रेमात? 'या' महाराष्ट्राच्या लाडक्या बॉलिवूड अभिनेत्याला करतेय डेट

इमरान हाशमीच्या आजारामुळे 'OG' चित्रपटाच्या शूटिंग तात्पुरती थांबवण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी इमरान हाशमीच्या प्रकृतीला प्राधान्य दिले असून, त्याच्या पूर्ण बरे होण्यापर्यंत शूटींग थांबवणार असल्याचे सांगितले आहे.इमरान हाश्मीच्या कामाचे कौतुक करत, त्यांने त्याच्या प्रकृतीबाबत त्वरित माहिती दिल्याचे निर्मात्यांनी सांगितले.

Emraan Hashmi Hospitalised
Sunny Leone: तू असे कपडे का घातले...; सनी लिओनीचा ग्लॅमरस लूक बघून चिडला 'हा' खास व्यक्ती

इमरान हाश्मी यांचा शेवटचा चित्रपट 'ग्राउंड झीरो' २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये त्यांनी बीएसएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. सध्या, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, लवकरच ते 'OG' चित्रपटाच्या शूटिंगसाठी परत येतील अशी अपेक्षा आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com